क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. T20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) संपल्यानंतर अनेक संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल पाहिला मिळत आहेत. त्यात 27 जुलैपासून टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिका (India Vs Sri Lanka series) होणार आहे. त्यापूर्वी संघाला नव्या हेड कोच मिळालाय. गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) नाही तर सनथ जयसूर्याकडे (sanath jayasuriya) जबाबदारी सोपवण्यात आलीय. (Team new head coach announced ahead of India Sri Lanka series sanath jayasuriya from World Cup winning team)
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाची खूप वाईट स्थिती होती. श्रीलंकेचा संघ सुपर 8 स्पर्धेतही पात्र ठरू शकला नाही. श्रीलंकेच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ख्रिस सिल्व्हरवुडने संघाच्या खराब कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त असल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SCB) सनथ जयसूर्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत श्रीलंकेचं मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. हो, बरोबर टीम इंडियाला (Indian Head Coach) नाही तर श्रीलंका संघाला नव्या हेड कोच मिळालाय.
Sanath Jayasuriya has been appointed as Sri Lanka's interim Head Coach. (Espncricinfo). pic.twitter.com/Ju718URByd
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2024
मुख्य प्रशिक्षक म्हणून सनथ जयसूर्या हे 27 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांसाठी संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान सनथ जयसूर्याने 1996 मध्ये विश्वविजेता बनलेल्या श्रीलंकेच्या संघात सर्वात मोलाचा वाटा उचलला होता.
सनथ जयसूर्या यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर श्रीलंका संघातून जवळपास 20 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. या काळात सनथ जयसूर्याने श्रीलंकेसाठी 110 कसोटी आणि 445 एकदिवसीय सामनेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सनथ जयसूर्याने 110 कसोटी सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी करताना 6973 धावा केल्या आहेत, तर सनथ जयसूर्याने 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13430 धाव संख्या आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सनथ जयसूर्याच्या नावावर 42 शतकं असून अशा स्थितीत सनथ जयसूर्यासारख्या दिग्गज खेळाडूचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश केल्यास श्रीलंका क्रिकेट संघाला फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.