वाढदिवसाच्याच दिवशी टीम इंडियाच्या 'या' शिलेदाराचा साखरपुडा

टीम इंडियातील अजून एक खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Updated: Jan 21, 2022, 10:46 AM IST
वाढदिवसाच्याच दिवशी टीम इंडियाच्या 'या' शिलेदाराचा साखरपुडा title=

मुंबई : टीम इंडियातील अजून एक खेळाडू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. टीममधील गोलंदाज अक्षर पटेल याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. वाढदिवसाच्याच दिवशी त्याने त्याची गर्लफ्रेंड मेहा हिच्या सोबत साखरपुडा केला आहे.

अक्षरने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना साखरपुड्याची माहिती दिलीये. अक्षरने ट्विटरवर मेहासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 
गुजरातमध्ये जन्मलेल्या अक्षर पटेलने त्याच्या वाढदिवस खूप खास बनवला. साखरपुड्याचा फोटो अक्षरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या खास सोहळ्याला अक्षर आणि मेहाच्या कुटुंबातील लोकांसह काही जवळचे लोकही उपस्थित होते.

साखरपुड्याचा फोटो ट्विटरवर शेअर करताना अक्षरने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “ही आयुष्याची नवी सुरुवात आहे. कायमंच एकत्र राहणार.''

अक्षर पटेलने भारतीय क्रिकेट टीमकडून 38 एकदिवसीय सामने खेळलेत. यादरम्यान त्याने 45 विकेट घेतल्या आहेत. अक्षरने 5 कसोटी सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत. शिवाय त्याने 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले असून त्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत.

अक्षरच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ससाठी अनेकवेळा उत्तम कामगिरी केलीये. अक्षरने आतापर्यंत 109 आयपीएल सामन्यांमध्ये 95 विकेट्स घेतल्या आहेत.