India vs Pakistan : आशिया कपमधील (Asia Cup) पाचव्या सामना पल्लेकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दुबळ्या नेपाळ संघाचा 10 गडी राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलंय. कारण आता पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाने वाचवलं पण आता सुट्टी नाय... अशी चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळवला गेला होता, त्या सामन्यात पावसाने सामन्याचा खेळखंडोबा केला. त्यानंतर आता टीम इंडिया पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यास सज्ज झाली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी नेपाळाचा पराभव केला आहे. त्यामुळे आता ग्रुप स्टेजमधून भारत आणि पाकिस्तानने सुपर-4 साठी क्वालिफाय केलंय. सुपर-4 मध्ये एकूण 6 सामने खेळवले जाणार आहे. चार संघ एकमेकांशी भिडतील. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानचा संघ देखील पुन्हा एकदा मैदानात उतरतील. येत्या 10 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघाने क्वालिफाय केलंय. तर ग्रुप ए गटातून कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल. याचं उत्तर आजच्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्यातून मिळणार आहे. सध्या श्रीलंकेचा संघ मजबूत स्थितीत दिसतोय. श्रीलंकेचा पराभव झाला तरी चिंता नाही. मात्र, लाजीरवाणा पराभव लंकन संघाला परवडणारा नाही. तर दुसरीकडे अफगाणिस्तानसाठी आजचा सामना करो या मरो असा असणार आहे.
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.