वॉर्म-अप सामन्यात पराभवानंतर Virat Kohli ने घेतली हार्दिक पंड्याची शाळा

पराभवानंतर विराट कोहलीने हार्दिक पंड्याची शाळा घेतली आहे. 

Updated: Oct 14, 2022, 03:08 PM IST
वॉर्म-अप सामन्यात पराभवानंतर Virat Kohli ने घेतली हार्दिक पंड्याची शाळा title=

मुंबई : लवकरच टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. दरम्यान वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सुमारे ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. यावेळी टीमचे वेस्टन ऑस्ट्रेलियाशी सामने देखील झाले. यामध्ये दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानंतर विराट कोहलीने हार्दिक पंड्याची शाळा घेतली आहे. 

टीम इंडियाने पहिला सराव सामना टीम इंडियान जिंकला. मात्र दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 36 रन्सने पराभव केला.

दुसऱ्या सराव सामन्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने जवळपास 20 मिनिटं हार्दिक पांड्याचा क्लास घेतला. या सामन्यामध्ये त्याने 9 बॉल्समध्ये केवळ 17 रन्स केले. यावेळी त्याला मोठी खेळी करता आली नाही.

यूट्यूब चॅनलवर एक व्हीडियो शेअर करण्यात आलाय. यामध्ये सामना संपल्यानंतर विराटने ऑस्ट्रेलियन परिस्थितीत फलंदाजी करण्याबाबत हार्दिकशी चर्चा केली असावी. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय. 

वर्ल्डकपपूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये विराट कोहली खेळताना दिसला नाही. इतकंच नाही तर तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण तो फिल्डींग करताना तो मैदानावर दिसला. दुसऱ्या सामन्यात कर्णधार केएल राहुलने 74 रन्स केले. मात्र तो सोडता इतर कोणत्याही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही.