IND vs Sl T20I Series | श्रेयस अय्यरकडून कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक, आता विराटची जागा घेणार?

 टीम इंडियाने (Team India ) विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंड, वेस्टइंडिजनंतर टीम इंडियाने श्रीलंकेलाही क्लीन स्वीप (IND vs Sl T20I Series)  दिला.   

Updated: Feb 28, 2022, 04:36 PM IST
IND vs Sl T20I Series | श्रेयस अय्यरकडून कोहलीचा मोठा रेकॉर्ड ब्रेक, आता विराटची जागा घेणार? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडियाने (Team India ) विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंड, वेस्टइंडिजनंतर टीम इंडियाने श्रीलंकेलाही क्लीन स्वीप (IND vs Sl T20I Series)  दिला. टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. यासह 3-0 क्लीन स्वीप दिला. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreys iyer) हा या मालिकेचा हिरो ठरला. त्याने या सीरिजमध्ये अफलातून कामगिरी केली.त्याने सलग 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकं ठोकली. श्रेयसने केलेल्या या धमाकेदार कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.  यासह श्रेयसने विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (team india vs sri lanka 3rd t20i series shreryas iyer break virat kohli most runs record in an one t20i series on 3 match)
 
विराटचा रेकॉर्ड ब्रेक

श्रेयसने एकूण 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. श्रेयसने एका टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. याबाबतीत त्याने विराटला मागे टाकलं आहे. यासह श्रेयस एका टी 20 सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. श्रेयसने 3 मॅचमध्ये 204 धावा केल्या. तर विराटने 3 सामन्यांमध्ये 199 धावा केल्या होत्या. 

श्रेयसने श्रीलंका विरुद्धच्या या 3 सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे नाबाद 57*, 74* आणि 73* धावा केल्या. विशेष म्हणजे श्रेयस तिन्ही वेळा नाबाद राहिला.

तर विराटने 2015-16 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3 सामन्यांच्या मालिकेत 199 रन्स केल्या होत्या. यात विराटने अनुक्रमे  90*, 59* आणि 50 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे विराट तेव्हा पहिल्या 2 सामन्यांमध्ये नाबाद राहिला होता.

टी 20 मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी

श्रेयस अय्यर - 204 धावा, विरुद्ध श्रीलंका 

विराट कोहली - 199 धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया 

विराट कोहली - 183 धावा, विरुद्ध वेस्टइंडिज

विराटचं संघातील स्थान धोक्यात? 

निवड समितीने विराट कोहलीला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती दिली. विराटने तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. मात्र विराटच्या अनुपस्थितीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. त्याने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्यामुळे टीम इंडियाला तिसऱ्या क्रमांकासाठी आणखी एक दमदार फलंदाज मिळाला आहे. 

तर दुसऱ्या बाजूला श्रेयसच्या या खेळीमुळे विराटचं संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. विराट गेल्या अनेक काळापासून अपयशी ठरतोय. त्यामुळे जर विराट पुढे असाच अपयशी ठरला, तर कदाचित श्रेयस त्याची संघातील जागा घेऊ शकतो.