IND vs Sl T20I Series | मुंबईकर बॅट्समनचा तडाखा, असा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय

 टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL T20I Series) 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात श्रीलंकेला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. 

Updated: Feb 28, 2022, 03:43 PM IST
IND vs Sl T20I Series | मुंबईकर बॅट्समनचा तडाखा, असा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL T20I Series) 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात श्रीलंकेला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पुन्हा एकदा विजयाचा हिरो ठरला. श्रेयसने या सामन्यात नाबाद 73 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच (Man Of The Match) पुरस्कार देण्यात आला. (team india vs sri lanka 3rd t20i shreryas iyer become 1st indian who hit 3 consecutive fifty at home venue) 

श्रेयसने या अर्धशतकी खेळीसह असा विक्रम केला, की जो आतापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासारख्या टी 20 स्पेशालिस्ट फलंदाजांनाही जमला नाही. श्रेयसने या तिसऱ्या सामन्यात 73 रन्सची तोडफोड खेळी केली. विशेष म्हणजे त्याचं हे या मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं.

यासह श्रेयस अशी अचाट कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला. श्रेयसने भारतात सलग 3 टी 20 सामन्यात 3 अर्धशतकं लगावण्याची कामगिरी केली. आतापर्यंत विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा या तिकडीने सलग 3 अर्धशतकं लगावली आहेत. मात्र ती कामगिरी परदेशात केली आहे. 

3 सामने, 3 अर्धशतकं आणि तितक्याच वेळा नॉट आऊट

उल्लेखनीय बाब म्हणजे श्रेयस या तिन्ही सामन्यांमध्ये नाबाद राहिला. श्रीलंकेच्या एकाही गोलंदाजाला श्रेयसला आऊट करता आलं नाही. श्रेयसने या टी 20 मालिकेत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे नाबाद 57*, 74* आणि 73* धावा केल्या.

श्रेयसने या 3 अर्धशतकांपैकी पहिलं अर्धशतक हे पहिले बॅटिंग करताना लगावलं. त्यानंतरचे सलग 2 अर्धशतकं ही विजयी धावांचं पाठलाग करताना झळकावली.   

'मॅन ऑफ द सीरिज'

श्रेयसने या संपूर्ण टी 20 मालिकेत बॅटिंगने श्रीलंकेच्या गोलंदाजींची पिसं काढली. श्रेयसने या मालिकेत एकूण 3 अर्धशतकांच्या मदतीने 204 धावा केल्या. 

दरम्यान आता उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे.