India Vs West Indies: भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान 5 सामन्यांची टी 20 मालिका 29 जुलैपासून सुरु होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. या मालिकेसाठी सीनियर खेळाडू वेस्टइंडिजमध्ये पोहोचले आहे. पण या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज टी 20 मालिकेतून बाहेर गेला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल या मालिकेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वी केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला एका आठवड्याचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या मालिकेत त्याचं न खेळणं जवळपास निश्चित आहे. केएल राहुल आयपीएल 2022 पासून टीम इंडियात खेळला नाही. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेपूर्वी जखमी झाला आहोता. त्यानंतर जर्मनीमध्ये हर्नियाची सर्जरी झाली होती. त्यानंतर नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅबमध्ये होता. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचं होतं. पण केएल राहुलला कोरोनाची लागण झाली. असं असलं तरी बीसीसीआयकडून केएल राहुलबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
टीम इंडिया वेस्टइंडिज नंतर झिम्बाब्वे दौरा करणार आहे. टीम इंडिया सहा वर्षानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे मॅच खेळणार आहे. हा दौरा 18 ऑगस्टपासून सुरु होईल. या दौऱ्यापूर्वी केएल राहुल फिट झाल्यास टीम इंडियाचा सदस्य असेल. केएल राहुल संघाचं कर्णधारपद देखील भूषवू शकतो.