मुंबई : चाहत्यांनी उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये. येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यामध्ये एकूण 16 टीम या स्पर्धेचा भाग असणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार असून तो पाकिस्तानसोबत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला या सामन्याची उत्सुकता लागलीये. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये.
तुम्हाला देखील क्रिकेटची आवड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही T20 वर्ल्ड कपचे मॅच थिएटर देखील पाहू शकता. मल्टिप्लेक्स कंपनी INOX ने ICC सोबत वर्ल्डकपसंदर्भात करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतातील सर्व सामने आपल्या आता थिएटरमध्ये दाखवणार आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनलचे सामनेही थिएटरमध्ये दाखवण्यात येण्याची सोय करण्यात आली आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास 25 शहरांमध्ये जिथे INOX चे स्क्रीनिंह होतात. त्या ठिकाणी T20 वर्ल्डकप 2022 मध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्यात येईल. अशा परिस्थितीत भारताचे सामने मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा असणाऱ्या चाहत्यांसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे.
• भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
• भारत विरुद्ध गट अ उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
• भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
• भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अॅडलेड)
• भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.