'SKY' सूर्यकुमार यादवचा 'या' मराठी सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट, व्हीडिओ पाहिलात?

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईकर असल्याने तो अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधतो. 

Updated: Jun 26, 2021, 06:08 PM IST
'SKY' सूर्यकुमार यादवचा 'या' मराठी सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट, व्हीडिओ पाहिलात? title=

मुंबई : टीम इंडिया (India Tour Sri Lanka 2021) लवकरच श्रीलंका दौऱ्यावर दाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकदिवसीय (ODI) आणि टी 20 मालिका (T 20 Series) खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणाही करण्यात आली आहे. विराट, रोहित या प्रमुख खेळाडूंशिवाय युवा ब्रिगेड श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करत आहे. मुंबईकर आणि टीम इंडियाचा युवा खेळाडू सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. सूर्या श्रीलंका विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. सूर्याने जीममध्ये मराठी गाण्यावर वर्कआऊट करतानाचा व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (team India suryakumar yadav work out in gym on marathi song)

काय आहे व्हीडिओत? 

सूर्या या व्हीडिओत 'ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ' या गाण्यावर वर्कआऊट करताना दिसतोय. हा व्हीडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. सूर्या मुंबईकर असल्याने तो अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधतो. तसेच तो आपल्या सहकाऱ्यांनाही मराठीत बोलायला शिकवत असतो.

टीम इंडियाच्या या श्रीलंका दौऱ्याला एकदिवसीय मालिकेपासून सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजला 13 जुलैपासून सुरुवात होत आहे. वनडेनंतर टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये सूर्याची निवड करण्यात आली आहे.

नेतृत्वाची जबाबदारी धवनकडे

शिखर धवनकडे टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आलंय.

युवा खेळाडूंना संधी

श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, नितीश राणा यांचा समावेश आहे.

सर्व सामने एकाच ठिकाणी

जगभरात कोरोनाचा जोर ओसरला आहे. मात्र परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. खेळाडूंना सामन्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दौऱ्यातील सर्व सामने हे एकाच स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांचे आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये (R. Premadasa Stadium) करण्यात आले आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 13 जुलै, कोलंबो

दुसरी ओडीआय, 16 जुलै, कोलंबो

तिसरा एकदिवसीय सामना, 18 जुलै, कोलंबो,

टी 20 मालिका

पहिली मॅच, 21 जुलै, कोलंबो.

दुसरी टी 20, 23 जुलै, कोलंबो.

तिसरा टी 20 सामना, 25 जुलै, कोलंबो.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरिया.

राखीव खेळाडू

ईशान पोरेल, संदीप वारियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजित सिंह. 

संबंधित बातम्या : 

IND vs SL: श्रीलंका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मोठी बातमी

मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी, सचिननंतर असा कारनामा करणारी दुसरीच क्रिकेटपटू