मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी, सचिननंतर असा कारनामा करणारी दुसरीच क्रिकेटपटू

क्रिकेट विश्वात मितालीची  (Mithali Raj) सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते.

Updated: Jun 26, 2021, 05:16 PM IST
मिताली राजची ऐतिहासिक कामगिरी, सचिननंतर असा कारनामा करणारी दुसरीच क्रिकेटपटू title=

मुंबई : भारतीय एकदिवसीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आपल्या नेतृत्वात संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. मितालीने सांघिक कामगिरीसह वैयक्तिक रेकॉर्डही केले आहेत. क्रिकेट विश्वात मितालीची सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते. या मितालीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मितालीच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीला 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. क्रिकेट विश्वात मिताली सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) असा पराक्रम करणारी दुसरीच क्रिकेटपटू ठरली आहे. (Indian women's cricket team captain Mithali Raj completes 22 years of ODI career)
 
मितालीचा पराक्रम

मितालीने आयर्लंड विरुद्ध 26 जून 1999 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सचिनची एकदिवसीय कारकिर्द एकूण 22 वर्ष 91 दिवसांची होती. सचिनने पदार्पण आणि अखेरचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. सचिनने 18 डिसेंबर 1989 ला वनडे डेब्यू केलं होतं. तर 2012 ला अखेरचा सामना खेळला होता. 

मितालीची विक्रमी कामगिरी

मिताली वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. सर्वाधिक धावांच्या बाबतीत मितालीनंतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची माजी खेळाडू चार्लोट एडवर्ड्स आहे. चार्लोटने वनडेतील 191 मॅचेसमध्ये 5 हजार 992 धावा केल्या होत्या. याआधी मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. मिताली अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय तर एकूण दुसरी फलंदाज ठरली होती.

संबंधित बातम्या : 

टी 20 वर्ल्ड कप आधी रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा?

ICC T20 World Cup Schedule: भारतात नाही तर या देशात होणार सामने

WTC 2021: विराट कोहली नको आता आम्हाला हवाय 'हा' मुंबईकर कॅप्टन