मुंबई : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) कायम चर्चेत असतो. पंतने आतापर्यंत टीम इंडियाला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला आहे. पंत बॅटिंग आणि विकेटकीपिंग या दोन्ही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी करतोय. अशातच आता पंतसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. (team india star batsman rishabh pant appointed as a state brand ambassador of uttarakhand)
उत्तराखंड सरकारने पंतची ब्रँड एम्बेसडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री धामी यांच्या हस्ते पंतचा दिल्लीतील उत्तराखंड सदनात सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने हे पद भूषवलं होतं.
"सरकारने देवभूमीचा पुत्र आणि टीम इंडियाचा प्रतिभावान खेळाडू ऋषभ पंतची राज्य सदिच्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील युवाना खेळ आणि आरोग्याबाबत प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, पंतची या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा", असं मुख्यमंत्री धामी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
पंत जन्माने उत्तराखंडचा आहे. मात्र त्याने दिल्लीचा कर्मभूमि म्हणून स्वीकार केला. पंतची आगामी आशिय कपसाठी 15 सदस्यीय खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली आहे. पंतने 2017 मध्ये टी 20 डेब्यू केलं होतं. त्यानंतर 2018 साली कसोटी आणि एकदिवसीय पदार्पण केलं. पंतने आतापर्यंत टीम इंडियासाचं 31 कसोटी, 27 वनडे आणि 54 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलंय.
प्रदेश सरकार ने देवभूमि के सपूत एवं भारतीय क्रिकेट टीम के प्रतिभावान खिलाड़ी @RishabhPant17 जी को उत्तराखण्ड के युवाओं को खेलकूद एवं जन स्वास्थ्य के प्रति प्रोत्साहित किए जाने के उद्देश्य से "राज्य ब्रांड एम्बेसडर" नियुक्त करने का निर्णय लिया है।
आपको हार्दिक शुभकामनाएं ! pic.twitter.com/2NP1lZ5pga
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 10, 2022