Team India Corona | टीम इंडियाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

वेस्टइंडिजच्या भारत दौऱ्याआधी (West Indies Tour India 2022) टीम इंडियाच्या (Team India) गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Feb 2, 2022, 10:27 PM IST
Team India Corona | टीम इंडियाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण title=

मुंबई :  टीम इंडिया (Team India) विरुद्ध वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यात 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची (Team India Corona) लागण झाली आहे.  दरम्यान बीसीसीआयने याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  (team india some players and support staff are tested corona positive before odi series against west indies)

टीम इंडिया आणि विंडिजमध्ये प्रत्येकी 3 सामन्यांची वनडे आणि टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना कोरोना झाल्याने मोठा फटका बसला आहे. खेळाडूंना कोरोना झाल्याने वनडे आणि टी 20 सीरिजच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

कोणाला झालाय  कोरोना? 

मिळालेल्या माहितीनुसार, 'गब्बर' शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे.  

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल. 

विडिंज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

पहिली वनडे - 6 फेब्रुवारी 
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी

पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी 
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी