भारताला 'या' संघाकडून मोठा धोका, वर्ल्ड कपच्या सेमीफानलमध्ये टाकणार खोडा

हा संघ बिघडवणार गेम 

Updated: Oct 26, 2021, 07:41 AM IST
भारताला 'या' संघाकडून मोठा धोका, वर्ल्ड कपच्या सेमीफानलमध्ये टाकणार खोडा  title=

 मुंबई : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021)मध्ये टीम इंडिया (Team India)चा पुढचा सामना 31 ऑक्टोबरला होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम (Dubai International Stadium)मध्ये न्यूझीलंड (New Zealand) च्या विरूद्ध खेळणार आहे. 'विराट आर्मी'करता आणखी एक संकट आहे. यामुळे सेमीफायनलला पोहोचण्याच स्वप्न तुटू शकतं. 

अफगाणिस्तानने घातला गोंधळ 

टी 20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021)अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने (Afghanistan Cricket Team) सुपर 12 च्या मॅचमध्ये स्कॉटलँड (Scotland)ला पिटाळून लावलं. ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थान मिळविले. अफगाण आर्मीने स्कॉटिश आर्मीचा 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला

भारत - अफगाणिस्तान सामना कधी? 

टीम इंडिया ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर महत्त्वाचा सामना खेळणार आहे. विराट कोहलीचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करता येईल.

अफगाणिस्तानचा संघ भारतासाठी धोका निर्माण करू शकतो, याचा अंदाज गेल्या सोमवारच्या सामन्यातून आला आहे. अफगाण सैन्याने स्कॉटलंडविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांचाही पराभव केला. 

अफगाणिस्तानकडून नजीबुल्ला जद्रानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. याशिवाय हजरतुल्ला झाझाईने 30 चेंडूत 44 धावा आणि रहमानउल्ला गुरबाजने 37 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 20 षटकात 4 गडी बाद 190 धावांपर्यंत नेली.

या बॉलर्सचा धुमाकूळ 

191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटिश संघाचे फलंदाज पूर्णपणे असहाय दिसले. संपूर्ण संघ 10.2 षटकात 60 धावा करून सर्वबाद झाला. केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, याशिवाय 4 फलंदाज बाद झाले.