कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माची वाट खडतर, माजी क्रिकेटपटूचा दावा

कसोटी संघाचा कर्णधार होण्यात रोहित शर्मासमोर अनेक अडचणी? पाहा काय म्हणाला माजी क्रिकेटपटू 

Updated: Jan 17, 2022, 03:53 PM IST
कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्माची वाट खडतर, माजी क्रिकेटपटूचा दावा  title=

मुंबई: दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी सीरिज पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कसोटी कर्णाधारपदावरून पायउतार झाल्यावर आता पुढच्या कर्णधार कोण असणार? याची प्रतीक्षा सर्वांना आहे. कर्णधारपदाच्या स्पर्धेत पपहिलं नाव रोहित शर्माचं तर दुसरं नाव के एल राहुलचं येत आहे. रोहित शर्माकडे आधीच वन डे आणि टी 20चं कर्णधारपद आहे. 

टीम इंडियाच्या कसोटी फॉरमॅटचा कर्णधार रोहित शर्मा होणं कठीण आहे असा दावा एक माजी क्रिकेटपटूने केला आहे. त्याच्यासाठी हा मार्ग जरा खडतर आहे पण का यामागचं नेमकं कारण काय असू शकतं याबद्दल जाणून घेऊया. 

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. रोहित शर्मा कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीव आहे असं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे. गेल्या एक वर्षात त्याने कसोटीमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. आता कसोटीचं उपकर्णधारपदही त्याच्याकडे आहे. 

या सगळ्या गोष्टी असल्या तरीही रोहित शर्मासमोर सर्वात मोठं आव्हान त्याचा फिटनेस आहे. 2020 सालापासून रोहित शर्मा तंदुरुस्त नसल्याने त्याला वारंवार ब्रेक घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकला तर तो कर्णधार होऊ शकतो, असं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे. 

ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका या दोन्ही मोठ्या दौऱ्यावर रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकत नाही. त्यामुळे त्याच्या फिटनेसमुळे ब्रेक लागत आहे. आता फेब्रुवारी महिन्यात श्रीलंके विरुद्ध कसोटी सीरिज आहे. त्याआधी कोणाकडे कसोटीच्या कर्णधारपदाचं नेतृत्व दिलं जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.