IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) हा सामना खेळवला जातोय. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताला फक्त 262 धावा करता आल्या. विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या दमदार खेळीमुळे भारताला हा टप्पा गाठता आलाय. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीसमोर कांगारूंनी टाकल्या नांग्या टाकल्याचं पहायला मिळालं आहे.
दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 115 रन्सचं लक्ष्य आहे. अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 रन्सवरच आटोपला. अश्विनने 3 तर जाडेजाने 7 विकेट्स काढल्या. आता भारतीय बॅट्समनसमोर दुसरी टेस्ट जिंकण्याचंही आव्हान आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समन ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर खेळपट्टीवर टीकू शकले नव्हते. 262 रन्सवरच भारताची पहिली इनिंग आटोपली होती. तेव्हा दिल्ली टेस्ट जिंकण्यासाठी भारतीय बॅट्समनना खेळपट्टीवर नांगर टाकून खेळावं लागेल.
दुसऱ्या डावात जडेजाचा भेदक मारा पहायला मिळाला. जडेजाने दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाने मोठा टप्पा गाठला आहे. उस्मान ख्वाजा कसोटी क्रिकेटमधील त्याचा 250 वा बळी ठरला.
आणखी वाचा - IND vs AUS test: Virat Kohli कोहली खरंच आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो...!
पहिल्या डावासारखं दुसऱ्या डावात देखील आश्विनने तीन विकेट घेत फिरकीची जादू दाखवली. हेड, स्मिथ आणि रेनशॉची विकेट घेत त्याने कंबरडं मोडलं.
कुह्नेमनने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली पायचित म्हणजेत एलबीडब्ल्यू झाला. तेव्हा चेंडू विराटची बॅट आणि पॅड या दोन्हीच्या बरोबर मधोमध होता. रिप्लेच्या व्हिडिओमध्ये बॉल आधी बॅटला लागल्यासारखं दिसत होतं. मात्र, थर्ड अंपायर्सनेही बाद असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे विराट कोहली देखील वैतागल्याचं दिसून आलं.