वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही रँकिंगमध्ये भारताला झटका

वेस्ट इंडिजविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने खिशात घातली. मात्र या विजयानंतरही भारताला वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.

Updated: Jul 8, 2017, 02:09 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही रँकिंगमध्ये भारताला झटका title=

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने खिशात घातली. मात्र या विजयानंतरही भारताला वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.

वेस्ट इंडिजविरुद्धचा एका सामन्यातील पराभव भारताला चांगलाच महागात पडलाय. या एका पराभवामुळे भारत वनडे रँकिंगमध्ये़ तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे ११४ गुण आहेत. तर इंग्लंड केवळ एक गुणांनी पिछाडीवर असून ते चौथ्या स्थानावर आहेत. 

द. आफ्रिका ११९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया ११७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताला दुसरे स्थान मिळण्याचा विश्वास होता. मात्र एका पराभवामुळे भारताच्या या विश्वासाला झटका बसलाय.