नवी दिल्ली : बॉलिंगमध्ये वैविध्य असल्यास बॅट्समन चक्रावून जातो. यामुळेच टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण हे लेफ्टी फास्ट बॉलरच्या शोधात आहेत. हा शोध पूर्ण झाल्यास टीम इंडियाचं आक्रमण आणखी मजबूत बनेल.
भारताचा फास्ट बॉलर झहीर खान याने निवृत्ती घेतल्यानंतर टीममध्ये चांगला लेफ्टी फास्ट बॉलर नाहीये. आशीष नेहराने काहीकाळ वन-डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. मात्र, दुखापतीमुळे तोदेखील टीमच्या बाहेर आहे. तर, बरिंदर सरांनेही चांगली कामगिरी केली नाहीये.
भारतीय 'अ' टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्याकडून भरत अरुण यांना खूप अपेक्षा आहेत. या दोघांसोबतही भरत अरुण चर्चा करणार आहेत.
भरत अरुण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी पून्हा कोचींगची जबाबदारी सांभाळत आहे आणि निश्चितच भारत 'अ' टीमच्या कोचसोबत चर्चा करेल. नव्या खेळाडूंचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी माहिती मिळणं गरजेचं आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलसारखे स्पिनर आपल्याकडे आहेत. आता आपल्याला लेफ्टी फास्ट बॉलरही मिळाला तर ते टीमसाठी चांगलं होईल.
आर अश्विन हा खूपच चांगला बॉलर आहे. आगामी २०१९च्या क्रिकेट वर्ल्डकपसाठी आर अश्विन हा टीमचा भाग आहे असंही भरत अरुण यांनी म्हटलं आहे.