मुंबई : भारत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आज भारताचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही महेंद्रसिंग धोनी मात्र आज पुन्हा हिरो ठरला आहे.
ढासळत्या भारतीय फलंदाजांमध्ये धोनी मात्र एकटा खिंड लढवत होता. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह आला आहे.
महेंद्रसिंग धोनीने अर्धशतक झळकावले आहे. याचा फायदा भारतीय संघाला विजय मिळवण्यात होऊ शकला नसला तरिही धोनीने रिटायरमेंट घ्यावी असे सल्ले देणार्यांसाठी उत्तर ठरले आहे.
न्यूझिलंड विरूद्धच्या टी 20 सामन्यानंतर रिटायरमेंट घ्यावी असा सल्ला दिला जात होता. मात्र विराट कोहली आणि रवी शास्त्रीने धोनीला पाठिंबा दिला होता.
आज धोनीच १०० वं आंतरराष्ट्रीय अर्धाशतक होते.
धोनीचा आजचा खेळ पाहून त्याच्या विरोधकांचे तोंड बं द झाले असेल अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत.
MS Dhoni haters right now. pic.twitter.com/NwhRBaty59
— Kamina__Chhora (@kamina__chhora) December 10, 2017
I am finding MS Dhoni haters...
I can't see you guys...
Where are you? In Graves or somewhere else.. #INDvsSL #INDvSL #RohitSharma pic.twitter.com/shGkT1gWWZ— Kajol (@kajol_0714) December 10, 2017
MS Dhoni Asked For A Review Even Before Umpire Gave The Decision. Dhoni Review System At His Best. #Dhoni #MSDhoni #INDvSL #INDvsSL pic.twitter.com/WtecynTjwR
— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) December 10, 2017
बुमराह आऊट नसतानाही त्याला आऊट जाहीर करण्याचा अंपायरच्या निर्णयाचा पुन्हा विचार केला जावा यासाठी त्याने सांगितले. त्यामुळे धोनीच्या तीक्ष्ण नजरेचेही काही मेम्सच्या माध्यमातून कौतुक करण्यात आले.