मुंबई : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) टीम इंडियाला लढायला शिकवलं. तर विराट कोहलीने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात देशात-विदेशात विजय मिळवून दिला. क्रिकेट विश्वात अनेकदा टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांची तुलना केली जाते. टीम इंडियाचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) गांगुली-विराटच्या तुलनेवर भाष्य केलंय. (team india former cricketer virender sehwag says sourav ganguly best captain than virat kohli)
भारतीय क्रिकेटमध्ये गांगुलीचं नेतृत्व हे इतर कर्णधारांच्या तुलनेत चांगली राहिली आहे, असं सेहवागचं मत आहे. तसेच विराटचे आकडे आणि रेकॉर्ड कितीही चांगले असले, तरीही त्याला गांगुलीप्रमाणे संघाची मोट बांधता आली नाही, असंही सेहवागने नमूद केलं. विराट आणि बीसीसआय अध्यक्ष गांगुली यांच्यात वाद झाला होता.
"गांगुलीने एक टीम बनवली, नव्या खेळाडूंचं नेहमीच समर्थन केलं. मला शंका आहे की, विराटने त्याच्या नेतृत्वात असं काही केलं असेल. विराटच्या नेतृत्वादरम्यान 2-3 वर्षांसाठी जवळपास प्रत्येक कसोटीनंतर संघात बदल करण्याची पद्धत होती. मग टीमचा विजय होऊ किंवा पराभव", असं सेहवाग म्हणाला. सेहवाग होम ऑफ हीरोज स्पोर्ट्स 18 सोबत बोलत होता.
"टीम बनवण्यासह खेळाडूंना आत्मविश्वास देणारा कर्णधारच नंबर 1 असतो. विराटने काही खेळाडूंना सपोर्ट केलं तर काहीना नाही", असा आरोपही सेहवागने विराटवर केला.