दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 4, 2017, 08:23 PM IST
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा title=

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20मध्ये विश्रांती दिल्यानंतर विराट कोहलीचं कमबॅक झालं आहे. तर श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये फॉर्ममध्ये नसलेल्या अजिंक्य रहाणेलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. आफ्रिकेमधल्या जलद खेळपट्ट्या लक्षात घेता स्पिनर कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि पार्थिव पटेलला संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारत 3 टेस्ट, 6 वनडे आणि 3 टी-20 खेळणार आहे. 5 जानेवारीला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट खेळेल. 

आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टेस्ट टीम

विराट कोहली (कॅप्टन), मुरली विजय, के.एल.राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(वाईस कॅप्टन), रोहित शर्मा, वृद्धीमान सहा(विकेट कीपर), अश्विन, जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह