विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर? 'या' खेळाडूला संधी मिळणार

 टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची (Team India vs New Zealand Test series 2021) मालिका खेळणार आहेत.  

Updated: Nov 9, 2021, 10:21 PM IST
विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर? 'या' खेळाडूला संधी मिळणार title=

मुंबई : टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात आलं. यानंतर भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यावर (New Zeland Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नसल्याचं म्हंटल जातंय. त्याच्या जागी आक्रमक फलंदाजाला संधी मिळू शकते. (Team India captain Virat Kohli is likely to rest for the first Test against New Zealand)

'द टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, विराट न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. विराटला विश्रांती दिली जाऊ शकते. पहिल्या कसोटीत विराटऐवजी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.

विराटऐवजी कोणाला संधी?

पहिल्या कसोटीत विराटच्या जागी मुंबईकर पृथ्वी शॉ याला संधी मिळू शकते. पृथ्वी आक्रमक फलंदाज आहेत. विराट टेस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळतो. चौथ्या क्रमांकावर पृथ्वी खेळू शकतो. कारण शुबमन आणि रोहित यांचे स्थान निश्चित आहे.

कसोटी सामन्यांचं ठिकाण 

दोन्ही संघात 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. पहिली कसोटी कानपूरमधील ग्रीन पार्क (Kanpur) आणि दुसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पार पडणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर. 

दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची. 

तिसरा सामना, रविवार, कोलकाता.
 
कसोटी मालिका

पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.  

दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.