गार्डनमध्ये कॅप्टन रोहितचा सराव, बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी Video

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Updated: Aug 25, 2024, 03:21 PM IST
गार्डनमध्ये कॅप्टन रोहितचा सराव, बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी Video title=
(Photo Credit : Social Media)

Rohit Sharma Training In Garden : बांगलादेशची टीम पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सिरीज आणि दोन सामान्यांची टी 20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे सिरीजमध्ये भारताचा 2-0  ने पराभव झाला होता तर एक सामना बरोबरीत सुटला. तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. कॅप्टन रोहित हा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर सोबत सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह वगळता इतर सर्व खेळाडूंना दुलीप ट्रॉफीत खेळण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे रोहित, विराट आणि बुमराह हे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मात्र बांगलादेशला धूळ चारण्यासाठी रोहितने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात कॅप्टन रोहित टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर सोबत सराव करताना दिसतोय. पार्कमध्ये रोहित सराव करण्यासोबतच अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखाली कार्डिओ सुद्धा करताना दिसला. बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती केल्यावर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर याची सुद्धा नियुक्ती केली. अभिषेक नायर हा रोहितचा खास मित्र सुद्धा आहे. 

भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सिरीज : 

19 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. 19 ते 23 सप्टेंबर पर्यंत टेस्ट सिरीजचा पहिला सामना एम चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असून 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना उत्तर प्रदेश येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात येईल.  त्यानंतर 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत- बांगलादेश यांच्यात टी 20 सिरीज खेळवली जाईल. 

रोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? 

रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह हे दोघे काही दिवसांपूर्वी सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये गेले होते. यादरम्यानचा रितिकाचा व्हिडीओ व्हायरल होत असून यावरून चाहते रितिका गरोदर असल्याचे बोलत आहेत. अवॉर्ड शो दरम्यान फोटोग्राफर्सनी काढलेल्या व्हिडीओमध्ये रितिकाचं पोट बाहेरच्या दिशेने वाढल्याचे दिसत होते यावरून अनेकांनी रितिका गरोदर असल्याचा अंदाज लावला. मात्र अद्याप रोहित शर्मा किंवा स्वतः रितिकाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.