Jasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार?

IPL 2024: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रती बुमराहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुमराहच्या पोस्टने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 28, 2023, 02:25 PM IST
Jasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार? title=

Mumbai Indians:टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही नवा वाद निर्माण झाला आहे. बुमराहने एक पोस्ट शेअर केली असून यात त्याने म्हटंलय, 'गप्प राहाणं कधी-कधी चांगलं उत्तर असतं' बुमराहच्या या पोस्टने क्रिकेट चाहते बुचकळ्यात पडले असून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. 

जसप्रीतच्या पोस्टचा अर्थ काय?
जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. पण बऱ्याच कालावधीनतर त्याने टीकात्मक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामुळे बुमराहने कोणत्या गोष्टीवर मौन पाळलं आहे, यावर चाहत्यांना प्रश्न पडला आहे. आपल्या पोस्टमध्ये बुमराहने कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. पण त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलं आहे आणि त्याचं उत्तर तो मौन बाळगून देतोय हे नक्की.

मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य
सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी बुमराहच्या पोस्टचा अर्थ मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indiance) जोडला आहे. मुंबई इंडियन्समध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराह कर्णधारपदाचा दावेदार होता. पण अचानक हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री झाल्याने बुमराह नाराज असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसंच मुंबई इंडियन्समध्ये नाराजीनाट्य सुरु झाल्याचंही सांगितलं जात आहे. इतकंचन नाही तर बुमराहने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं असून लवकरच तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

हार्दिक पांड्याने आपल्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं होतं. तर दुसऱ्या हंगामातही गुजरात टायटन्सने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. टीम इंडियाच्या टी20 फॉर्मेटमध्ये हार्दिक पांड्या कर्णधार आहे. अशात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा आगामी कर्णधार बनणं जवळपास निश्चित आहे. 

 

वर्ल्ड कप पराभवानंतर ट्विट
दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचं दु:ख कमी करण्यासाठी बुमराहने हे ट्विट केल्याचीही चर्चा आहे. विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाच्या तब्बल 10 दिवसांनंतर बुमराहनेहे ट्विट केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. आता पोस्टवरुन बुमराहन निराश असल्याचा अंदाजही बांधला जात आहे. 

विश्वचषकात दमदार कामगिरी
दुखापतीनंतर विश्वचषकात जसप्रीत बुमराहने दमदार कमबॅक केलं. भारतातर्फे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 11 सामन्यात 20 विकेट घेतल्या.