Asia Cup : अखेर टीम इंडियाने जिंकला आशिया कप; फायनलमध्ये बांग्लादेशाचा उडवला धुव्वा

Asia Cup : फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ( Team India ) 7 विकेट्स गमावून 127 रन्स केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 

Updated: Jun 21, 2023, 05:32 PM IST
Asia Cup : अखेर टीम इंडियाने जिंकला आशिया कप; फायनलमध्ये बांग्लादेशाचा उडवला धुव्वा title=

Asia Cup : टीम इंडियाच्या ( Team India ) महिलांनी पुन्हा एकदा स्वतःच्या शिरपेचात तुरा रोवलाय. वुमन्स इमर्जिंग आशिया कप 2023 वर टीम इंडियाच्या मुलींनी भारताचं नाव कोरलंय. या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत अ ने बांगलादेश अ टीमचा पराभव केला. टीम इंडियाने ( Team India ) हा सामना 31 रन्सने जिंकून विजेतेपदाचा सामना जिंकला.

वुमन्स इमर्जिंग आशिया कप 2023 ( ACC Womens Emerging Teams Asia Cup 2023 ) च्या फायनल सामन्यात देखील पुन्हा एकदा भारताच्या गोलंदाजांची कमाल पहायला मिळाली. फायनल सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ( Team India ) 7 विकेट्स गमावून 127 रन्स केले. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. यावेळी बांग्लादेशाची टीम अवघ्या 96 रन्समध्ये ऑलआऊट झाली.

टीम इंडियाकडून बांग्लादेशाला 128 रन्सचं आव्हान

अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कर्णधाराने टॉस जिंकला. टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी डावाची सुरुवात कर्णधार श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री यांनी केली. या जोडींने 28 रन्स केले. यानंतर कनिका आहुजाच्या 30 रन्स आणि वृंदा दिनेशच्या 36 रन्स जोरावर टीमला 20 ओव्हर्समध्ये 127 रन्स करणं शक्य झालं. यावेळी बांगल्यादेशाकडून सुलताना खातून आणि नाहिदा अख्तरने 2-2 विकेट घेतल्या. टीम इंडियाने बांग्लादेशाच्या महिलांना जिंकण्यासाठी 128 रन्सचं आव्हान दिलं होतं. 

बांग्लादेशाची फलंदाजी गडगडली

फलंदाजी करण्यासाठी उतरलेली बांग्लादेशाच्या टीमला 100 रन्स करणंही शक्य झालं नाही. टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाजांनी अवघ्या 96 रन्समध्ये बांग्लादेशाच्या सर्व मुलींना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. 19.2 ओव्हर्समध्ये बांग्लादेशाची टीम ऑलआऊट झाली आणि भारताचा विजय झाला. 

श्रेयांका पाटीलने बांग्लादेशाची उडवली दाणादाण

बांग्लादेशाच्या फलंदाजांमध्ये केवळ तिघींना दुहेरी आकडा गाठणं शक्य झालं. या सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडियाची गोलंदाज श्रेयांका पाटील  विजयाची शिल्पकार ठरली. श्रेयांकाने 4 ओव्हर्समध्ये 13 रन्स देत 4 विकेट्स काढले. याशिवाय मन्नत कश्यपने 3 आणि कनिका आहूजा 2 विकेट्स घेतलेत.