मुंबई : वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये 3-0 ने मात दिल्यानंतर टीम इंडियाने एक मोठा टप्पा गाठला आहे. टीम इंडिया आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 ठरली आहे. जवळपास 6 वर्षानंतर टीम इंडियाला ही कामगिरी करता आली आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना टीम इंडियाने 2016 साली हा टप्पा गाठला होता.
ही सिरीज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाची रेटिंग्ज 268 होती. इंग्लंडनंतर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर होती. मात्र वेस्ट इंडिज विरूद्धची सिरीज जिंकल्यानंतर भारताची रेटिंग्ज 3-0 अशी झाली. मुख्य म्हणजे इंग्लंडचे रेंटींग्ज देखील इतकेच आहेत. मात्र टीम इंडिया पॉईंट्सच्या हिशोबाने नंबर रँकिंगमध्ये नंबर 1 ठरली आहे.
यापूर्वी टीम इंडिया 23 फेब्रुवारी 2016 ते 3 मे 2016 पर्यंत आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होती. त्यावेळी टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. धोनीनंतर टी-20 चं कर्णधारपद विराटच्या हाती सोपवण्यात आलं. विराटच्या कारकिर्दीत टीम इंडिया बराच काळ टेस्टमध्ये नंबर 1 राहिली. मात्र टी-20 मध्ये अव्वल येऊ शकली नाही.
विराटय कोहलीच्या अंतर्गच टीम इंडियाने 2021मध्ये टी-20 वर्ल्डकप खेळला. ज्यामध्ये टीमला सेमीफायनची जागाही मिळवणं कठीण झालं होतं. विराटने हा वर्ल्डकप खेळण्यापूर्वीच टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर रोहितने कर्णधारपदाची धुरा सांभाळली असून तो इतिहासातील तिसरा यशस्वी कर्णधार ठरलाय.