Asia Cup: भारत-पाक सामन्याआधीच टेन्शनवाली बातमी! 'त्या' 5 जणांनी Yo-Yo Test दिलीच नाही कारण...

Team India Asia Cup 2023 Preparation Practice Camp: सध्या आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेले सर्व 17 खेळाडू बंगळुरुजवळ एका सराव शिबिरामध्ये सहभागी झाले असून ते कसून सराव करत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 28, 2023, 08:52 AM IST
Asia Cup: भारत-पाक सामन्याआधीच टेन्शनवाली बातमी! 'त्या' 5 जणांनी Yo-Yo Test दिलीच नाही कारण... title=
सध्या भारतीय संघ बंगळुरुमध्ये करत आहे सराव

Team India Asia Cup 2023 Preparation Practice Camp: टीम इंडिया संध्या बंगळुरुजवळच्या अलूर येथे आशिया चषक स्पर्धेसाठी सराव करत आहे. 6 दिवसीय शिबीराच्या पहिल्या दिवशी सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी झाली. याशिवाय शारीरिक क्षमता जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली यो-यो चाचणीही पार पडली. या यो-यो चाचणीमध्ये शुभमन गिलला (18.7) हा असा सर्वाधिक स्कोअर करण्यात यश मिळालं. इतरही अन्य खेळाडू यो-यो चाचणी उत्तीर्ण झाले. मात्र आशिया चषक संघामध्ये अंतिम 17 खेळाडूच्या यादीत समावेश असलेल्या काहींनी अनिवार्य असलेली यो-यो चाचणी दिली नाही. ही अनिवार्य चाचणी न देणाऱ्या खेळाडूंची यादीच समोर आली आहे.

कोण आहेत हे 5 खेळाडू

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषक स्पर्धत असलेल्या ज्या 5 खेळाडूंनी यो-यो चाचणी दिली नाही त्यामध्ये जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (आशिया चषकासाठी राखीव खेळाडू) आणि के. एल. राहुल यांचा समावेश आहे. के. एल. राहुल अद्याप पूर्णपणे तंदरुस्त झालेला नाही. त्यामुळेच त्याच्यासंदर्भात कोणताही धोका संघ व्यवस्थापनाला घेण्याची इच्छा नाही. के. एल. राहुलने पहिल्या दिवशी अगदी जीममधील सेशनमध्येही सहभाग नोंदवला. मात्र संघ व्यवस्थापन आणि फिजिओ के. एल. राहुलला यो-यो चाचणी देण्यासाठी सध्या तरी आग्रही नाहीत. त्यामुळेच के. एल. राहुलने यो-यो चाचणी दिलेली नाही.

अन्य चौघांनी का दिली नाही यो-यो चाचणी?

जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन हे सर्व खेळाडू आयर्लंड दौऱ्यावरुन परत आले आणि लगेच ते या सराव शिबिरामध्ये सहभागी झाले. सध्या या 5 जणांची चाचणी घेण्यात आली नसली तरी यो-यो चाचणी उत्तीर्ण झाल्याशिवाय या 5 जणांना अंतिम 11 मध्ये संधी मिळणार नाही. त्यामुळेच बुमराहसारख्या खेळाडूसहीत तिलक वर्माचा समावेश असल्याने चाहत्यांचं टेन्शन थोडं वाढलं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

नक्की वाचा >> Insta Stories मधून विराटला डिवचणाऱ्याला डच्चू! आशिया चषक स्पर्धेच्या संघात स्थान नाही

दोन खेळाडूंनी केला विशेष सराव

एक दिवस आधीच भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेमधील पल्लेकलमध्ये होईल. भारतीय संघाने तयारीसाठी एका धोरणानुसार काम सुरु केला आहे. या धोरणानुसार खेळाडूंना वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये पारखलं जाईल. याला तांत्रिक भाषेत मॅच सिम्युलेशन असं म्हणतात. प्रत्यक्ष सामन्यांसाठी खेळाडूंना स्वत:ला तयार करण्याची संधी मिळावी म्हणून याचा समावेश सरावामध्ये करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांनी मागील आठवड्यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये मॅच सिम्युलेशनच्या माध्यमातून आपली क्षमता, फलंदाजी आणि फील्डींगच्या क्षमतेची चाचपणी केली होती.

रोहित-शुभमनच करणार ओपनिंग

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सेंटर विकेटवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सराव केला. सध्या भारतीय संघ आक्रमक खेळ करताना दर 10 ओव्हरसाठी रणनिती ठरवून त्याप्रमाणे सामना खेळतो. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने सेंटर विकेटवर याच धोरणाला धरुन फलंदाजी केल्याचं पहायला मिळालं. दोघेही पहिल्या 10 ओव्हर लक्षात घेऊन फलंदाजीचा सराव करत आहेत. त्यानंतर दोघांनीही बऱ्याच वेळ आपल्या काय चुका झाल्या, फटके कुठे चुकले याचं विश्लेषण केलं. हे दोघेच आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून ओपनिंगसाठी उतरतील असं जवळजवळ निश्चित झालं आहे.

गोलंदाजांची फळी

या सराव शिबिरासाठी 12 हून अधिक नेट गोलंदाजांचा वापर केला जात आहे. रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि हार्दिक पंड्या रोज उशीरापर्यंत सराव करताना दिसत आहेत.