नवी दिल्ली : टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलियाचा फ्लॉप शो काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकामागोमाग एक होत असलेल्या सामन्यामंध्ये ऑस्ट्रेलियाची हाराकिरी सुरूच आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यानंतर आता टी २० सामन्यातही तिच हालत आहे. गेल्या पाच वर्षात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध एकही टी २० सामना जिंकला नाही. रांचीवरील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा हा सलग सातवा पराभव आहे. एवढेच नव्हे तर गेल्या १४ सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध ८ कर्णधार खेळविले पण त्यांच्या पदरी निराशाच आली.
रांचीच्या सामन्यात स्मिथच कर्णधार असणार होता परंतु दुखापत झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदाची संधी मिळाली परंतु तोही काही कमाल करू शकला नाही. भारत आणि कांगारू संघादरम्यान टी २० च्या इतिहासात आतापर्यंत १४ सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलिया केवळ ४ सामने जिंकला आहेत. १० सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या काळात ऑस्ट्रेलिया संघाने ८ कर्णधारांची निवड केली आहे.
भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाचे शेवटचे १४ सामने
कॅप्टन ठिकाण निकाल
अॅडम गिलख्रिस्ट डरबन २००७ भारत १५ धावांनी विजयी
रिकी पाँटिंग मुंबई २००७ भारत ७ गडी राखून विजयी
मायकल क्लार्क मेलबर्न २००८ ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून जिंकला
मायकल क्लार्क ब्रिजटाऊन २०१० ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी
जॉर्ज बेली सिडनी २०१२ ऑस्ट्रेलिया३१ धावांनी विजय
जॉर्ज बेली मेलबर्न २०१२ भारत ८ विकेट्सने जिंकला
जॉर्ज बेली कोलंबो २०१२ ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
जॉर्ज बेली राजकोट २०१३ भारत ६ विकेट्सनी विजयी
जॉर्ज बेली ढाका २०१४ भारत ७३ धावांनी विजयी
ऍरोन फिंच ऍडलेड २०१६ भारत ३७ धावांनी पराभूत
अर्नुन फिंच मेलबर्न २०१६ भारत २७ धावांनी विजय
शेन वॅटसन सिडनी २०१६ भारत ७ गडी राखून विजयी
स्टीव्हन स्मिथ मोहाली २०१६ भारत ६ गडी राखून विजयी
डेव्हिड वॉर्नर रांची २०१७ भारत ९ गडी राखून विजयी
या १४ सामन्यांमध्ये भारतातर्फे २ कर्णधार खेळले होते. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोघांच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडिया खेळली.