Tamim Iqbal Withdraws Retirement: बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बाल याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर तमीम इक्बालने निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्ती जाहीर करताना त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता तमिम इक्बाल याने अखेर निवृत्ती मागे घेतली आहे.
Tamim Iqbal has withdrawn his decision from retiring from International cricket after the Prime Minister of Bangladesh took this matter. [Espn Cricinfo] pic.twitter.com/zkb02Lxt3K
— Johns. (@CricCrazyJohns) July 7, 2023
तमिम इक्बाल याने फक्त 24 तासाच्या आत निवृत्ती मागे घेतल्याने आता चर्चेला उधाण आल्याचं दिसून येतंय. बांग्लादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता तमिमने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. यासह 34 वर्षीय तमिम इक्बालची 16 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आल्याने बांग्लादेश टीमची चिंता वाढली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी थेट विनंती केल्याने आता तमिम इक्बालने निवृत्तीचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.
तमिमने गुरुवारी चितगाव येथे पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली. यावेळी तमीम भावूक झाल्याचं पहायला मिळालं, त्यावेळी त्याचे डोळे पाणावले होते. माझ्यासाठी हा शेवट आहे. मी माझे सर्वोत्तम दिलं, अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्याचे डोळ्यातील पाणी सर्वांसाठी भावूक क्षण होता. सहकारी, सपोर्ट स्टाफ, बीसीबी अधिकारी, माझे कुटुंबीय आणि या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो, असं म्हणत त्याने रामराम ठोकला होता. मात्र, पंतप्रधानांनी तमिमची समजूत काढली आणि त्याला पुन्हा वर्ल्ड कपसाठी तयार केलंय.
आणखी वाचा - चेला असावा तर असा! गुरूसाठी ऋषभ पंतने केलं खास सेलिब्रेशन; म्हणतो 'आप तो हो नहीं पर...'
दरम्यान, दरम्यानस बांग्लादेशने तीन एकदिवसीय मालिकेतील पराभवाने सुरुवात केली होती. डकवर्थ लुईस नियमानुसार पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने 17 धावांनी पराभूत केले होते. आता या मालिकेतील दोन सामने बाकी आहेत. दुसरा सामना 8 जुलैला तर तिसरा सामना 11 जुलैला होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय.