Team India for T20 World Cup : एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धा आता संपली आहे आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) इथं टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अशात टीम इंडियात (Team India) कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Team India Squad for T20 World Cup)
भारतीय क्रिकेटे निवड समितीची (Indian Selectors) आज मुंबईत (Mumbai) बैठक होणार आहे. या बैठकीत टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या निवडीची शक्यता आहे. एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली होती. त्यामुळे संघ निवडीवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. एशिया कप ही प्रयोग करणाऱ्यासारखी स्पर्धा होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली कोणत्या खेळाडूंना संधी द्यावी याचं मोठं आव्हान निवड समितीसमोर असणार आहे.
अशी असेल भारतीय टीम?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल
रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त
एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला एशिया कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपमध्ये त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अशात रविंद्र जडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देण्यात यावी हा प्रश्नही निवड समितीसमोर आहे.
वर्ल्ड कप आधी क्रिकेट मालिका
दरम्यान, टी20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठीही आज भारतीय संघ निवडला जाण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान भारतात ती टी20 सामने खेळवले जाणार आहेत.
पहिला टी20 सामना (20 सप्टेंबर) - मोहाली
दूसरा टी20 सामना (23 सप्टेंबर) - नागपूर
तीसरा टी20 मैच (25 सप्टेंबर) - हैदराबाद
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
पहिली टी20 सामना (28 सप्टेंबर) - तिरुवनन्तपुरम
दूसरा टी20 सामना (2 ऑक्टोबर) - गुवाहाटी
तीसरा टी20 सामना (4 ऑक्टोबर) - इंदौर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना (6 ऑक्टोबर) - लखनऊ
दूसरा एकदिवसीय सामना (9 ऑक्टोबर) - रांची
तीसरा एकदिवसीय सामना (11 ऑक्टोर) - दिल्ली
टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 17 ऑक्टोबर - गाबा
भारत विरुद्ध न्यूजीलंड - 19 ऑक्टोबर - गाबा