मुंबई : टी 20 विश्वचषक 2021 हे 17 ऑक्टोबरला यूएईमध्ये सुरू होमार आहे. यावर्षी टी -20 वर्ल्ड चॅम्पियन जिंकण्यासाठी भारतला प्रबळ दावेदार मानले गेले असते. टी 20 विश्वचषक 24 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळला जाणार आहे. भारताचे 4 खेळाडू आहेत जे भारताला दुसऱ्यांदा टी -20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून देऊ शकतात. या 4 खेळाडूंमध्ये क्षणार्धात सामना फिरवण्याची ताकद आहे. चला त्या 4 खेळाडूंवर एक नजर टाकूया.
रोहित शर्मा टी -20 वर्ल्डकपमध्ये भारताचा सर्वात मोठा मॅच विनर सिद्ध होईल. जर रोहित शर्माची बॅट चालली, तर तो क्षणात सामना वळवू शकेल. रोहित जो सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहेत, तो भारताच्या मजबूत फलंदाजीमधील महत्त्वाचा सदस्य असेल. रोहितने 111 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.54 च्या सरासरीने 2 हजार 864 धावा केल्या आहेत, ज्यात चार शतके आणि 22 अर्धशतके आहेत.
वरुण चक्रवर्तीला पहिल्यांदाच टी -20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली आहे. भारताकडे असलेल्या वरुण चक्रवर्तीमध्ये एक गूढ फिरकीपटू आहे, जो सात प्रकारे गोलंदाजी करू शकतो. यामध्ये ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन, बोटांवरील यॉर्कर यांचा समावेश आहे.
वरुण चक्रवर्ती टी -20 विश्वचषक स्पर्धेत विरोधी संघांसाठी घातक ठरू शकतो. आतापर्यंत टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने 3 सामन्यात 2 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलच्या 21 सामन्यांमध्ये 25 बळी घेतले आहेत.
ऋषभ पंत पहिल्यांदाच टी -20 विश्वचषकमध्ये खेळणार आहे. स्फोटक फलंदाजीत माहिर असलेल्या ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान आहे. यासोबतच ऋषभ पंत विकेट किपींगची जबाबदारीही घेईल. ऋषभ पंतला याआधी वर्ल्ड कप 2019 मध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
केएल राहुलला पहिल्यांदाच टी -20 विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली आहे. याआधी तो भारतासाठी 2019 चा विश्वचषकातही खेळला आहे. राहुलला सलामीवीर म्हणून टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. टी -20 विश्वचषक संघात राहुलचा समावेश करण्यासाठी शिखर धवनला वगळण्यात आले आहे. टी -20 विश्वचषकादरम्यान राहुल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. सलामीची जबाबदारी राहुल आणि रोहित शर्मावर असेल.