मुंबई : T20 World Cup: गेल्या काही महिन्यांत ऋषभ पंत (Rishabh Pant) याची कामगिरी खराब झाली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियामध्ये दोन असे यष्टिरक्षक आहेत, जे टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंत याची जागा घेऊ शकतात आणि त्याच्यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकतात. खराब फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे विश्वचषक सामन्यांमध्ये भारताची पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभव न होण्याची मालिका खंडित झाली आहे. (T20 World Cup: Rishabh Pant's performance in the last few months has been poor, this player can become a wicketkeeper!)
टी-20 विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पाकिस्तानने 10 विकेट राखून पराभव केला. या मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, तर T20 World Cupमधून बाहेर जाण्याचा धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणतीही संधी गमवावी गमवून चालणार नाही. ऋषभ पंतची पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यात अत्यंत खराब कामगिरी झाली होती. या सामन्यात ऋषभ पंतने 30 चेंडूत 39 धावांची संथ खेळी खेळली.
ऋषभ पंत याची गेल्या काही महिन्यांतील कामगिरी खराब झाली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियामध्ये दोन असे यष्टिरक्षक आहेत, जे टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंत याची जागा घेऊ शकतात. तसेच त्याच्यापेक्षाही चांगली कामगिरी करू शकतात. पाकिस्तानविरुद्धच्या या पराभवामुळे भारतीय चाहते दु:खी झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील T-20 विश्वचषक सामन्यात ऋषभ पंत याची जागा घेऊ शकणार्या दोन यष्टिरक्षकांवर एक नजर टाकूया.
टीम इंडियाचा युवा खेळाडू ईशान किशन फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही अग्रेसर आहे. ईशान किशन याचा फॉर्म पाहता पुढील सामन्यात ऋषभ पंत याच्या जागी तो सर्वोत्तम खेळाडू ठरेल. याआधी टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात ईशान किशनने अशी चांगली कामगिरी केली की इंग्लंड संघाकडे त्याचे प्रत्युत्तर नव्हते. ईशान याने 46 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावा केल्या. ईशान किशन हा अतिशय धोकादायक फलंदाज आहे. यंदा मुंबई आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरू शकली नाही, पण शेवटच्या साखळी सामन्यात ईशान किशन याने आश्चर्यकारक कामगिरी केली.
शेवटच्या साखळी सामन्यात जेव्हा मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला होता. यावेळी करा किंवा मरा अशी स्थिती होती. यावेळी मुंबई इंडियन्सला 170 धावांनी विजय मिळवायचा होता. मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचता आले नाही पण ईशान किशन याच्या बॅटने या सामन्यात चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात इशानने केवळ 32 चेंडूत 84 धावा केल्या. ईशान किशन याची ही धमाकेदार खेळी पाहून सगळेच थक्क झाले. आगामी काळात ईशान किशन ऋषभ पंत याच्या जागी खेळू शकतो आणि तो सामना स्वबळावर फिरवू शकतो. ईशान किशनमध्ये टॅलेंटची कमतरता नाही.
भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर जर कोणी फलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जोरदार खेळत असेल तर तो स्टार फलंदाज केएल राहुल आहे. गेल्या एक वर्षापासून केएल राहुल याने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात आपले स्थान पक्के करु शकतो. एवढेच नाही तर केएल राहुललाही यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आणि त्याने चांगली कामगिरी केली.
केएल राहुलने दाखवून दिले आहे की, ज्यामध्ये तो फलंदाजासोबतच यष्टिरक्षक म्हणूनही संघात स्थान मिळवू शकतो. त्याने आता टी-२० विश्वचषकात ऋषभ पंत याच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ऋषभ पंत याच्या जागी केएल राहुलही सर्वोत्तम खेळाडू ठरेल.