टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करत क्रिकेटविश्वाला धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तसंच बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करत सेमी-फायनलमधील आपली जागा निश्चित केली आहे. अफगाणिस्तान संघावर सध्या स्तुतीसुमनं उधळली जात असून, सोशल मीडियावरही त्यांचीच चर्चा आहे. अफगाणिस्तान संघ ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा निर्माण करत आहे ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी काहीजण मात्र भारताविरोधात खेळताना त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय घेत आहेत. आयपीएल कराराचा उल्लेख करत हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान भारतीय खेळाडू आर अश्विनने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानमधील एका पत्रकाराने एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे, आयपीएलमध्य जागा मिळवायची असल्याने अफगाणिस्तान संघ भारत वगळता जगातील कोणत्याही संघाला पराभूत करु शकतात. "अफगाणिस्तान भारताशिवाय जगातील कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. आयपीएल करार खूप मौल्यवान आहेत हे यामागील स्पष्ट कारण आहे," असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पाकिस्तानी पत्रकाराच्या या पोस्टला आर अश्विनने उत्तर दिलं आहे. त्याने थेट एलॉन मस्कलाच टॅग केलं आहे. माझी टाईमलाइन, माझा निर्णय असं लिहित त्याने माझ्या घऱात कोण प्रवेश करणार याचा निर्णय घेणार असं आवाहन मस्कला केलं आहे. "एलॉन मस्क तुम्हाला मी तुम्ही काय करावं हे सांगू शकत नाही. पण माझ्या घरात कोण प्रवेश करणार हे ठरवण्याचा अधिकार मला नक्कीच असला पाहिजे. माझी टाइमलाइन माझा निर्णय," असं त्याने लिहिलं आहे.
I can’t tell u what to do @elonmusk but I should certainly have the right to decide who enters my house.
My timeline my decision https://t.co/WsR95ToHSk
— Ashwin (@ashwinravi99) June 23, 2024
यादरम्यान एकाने आर अश्विनला अशा लोकांना ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. त्यावर आर अश्विनने लिहिलं की, "काही हँडल्सना ब्लॉक करत बसणं हे माझं काम नाही. पण कोणाला फॉलो करायचं हे मला माहिती आहे".
It’s shouldn’t be my duty to block a set of handles every day.
I know who I want to follow.— Ashwin (@ashwinravi99) June 23, 2024
टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानने यापूर्वीच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. तसंच सुपर 8 मध्ये बांगलादेशचाही पराभव करत सेमी-फायनल गाठली आहे. इतकंच नव्हे तर या विजयासह बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा सेमी-फायनलचा मार्गही बंद केला आहे.
टॉस जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने आधी फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रेहमानुल्ला गुरबाजने 55 बॉलमध्ये 43 धावांची उत्तम खेळी केली. मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानला या 'करो या मरो'च्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून राशीह हुसैनने 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तस्कीन अहमद आणि मुस्तफिजूर रेहमानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बांगलादेशला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 19 ओव्हरमध्ये 116 ऐवजी 114 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र 7 बॉल बाकी असतानाच बांगलादेशचा संपूर्ण संघ तंबूत परतला. शेवटच्या 8 बॉलमध्ये 9 धावा हव्या असताना बांगलादेशचा शेवटचा फलंदाज पायचित झाला अन् अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष सुरु केला.