टीम इंडियाच्या प्लेइंग XI मधून हार्दिक पांड्याचा पत्ता कट? विराट कोहली म्हणाला...

भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या महामुकाबल्याआधी मोठी अपडेट येत आहे.

Updated: Oct 24, 2021, 03:45 PM IST
टीम इंडियाच्या प्लेइंग XI मधून हार्दिक पांड्याचा पत्ता कट? विराट कोहली म्हणाला... title=

दुबई: भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या महामुकाबल्याआधी मोठी अपडेट येत आहे. हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरून गेल्या काही दिवसांमध्ये वाद सुरू आहेत. त्याला संघात घेणार की नाही याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. हार्दिक पांड्या गेल्या काही सामन्यात खराब फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्यावर मोठं विधान केलं आहे. 

हार्दिक पांड्या टीममध्ये सहाव्या नंबरवर खेळणं अत्यंत आवश्यक आहे. हे टीमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. एवढ्या कमी वेळात त्याच्यासाठी पर्याय शोधणं शक्य नाही टीम इंडियाचा कर्णधार विरोट कोहली म्हणाला आहे. कोहलीच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट होत की हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी खेळणं आवश्यक आहे. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील असू शकतो. 

टीम इंडियामधून हार्दिक पांड्याचा पत्ता कट?
कोहली म्हणाला की जरी हार्दिक पांड्याने जरी टी 20 वर्ल्ड कपमध्ये जरी गोलंदाजी केली नाही. तरी देखील तो प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचं स्थान निश्चित झालं आहे. 2019 मध्ये हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो क्वचितच गोलंदाजी करू शकला. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपमध्ये तो फक्त फलंदाज म्हणून खेळू शकेल असंही सांगण्यात आलं आहे. 

पांड्याच्या क्रिकेटमधील करियवर कोहलीचं मोठं वक्तव्य
मला असं वाटतं की हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर बोलायचं तर तो आता चांगला फीट होत आहे. त्यामुळे त्याचा विचार करता हार्दिक पांड्या संघासाठी महत्त्वाचा असल्याचं कोहलीनं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात कोहलीने स्वत: बॉलिंग केली. कोहलीसाठी पांड्या संघात असणं हे टीमच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं महत्त्वाचं आहे. 

कोहली म्हणाला, 'मी त्याला फक्त ऑस्ट्रेलियामध्ये एक फलंदाज म्हणून खेळण्याचे समर्थन केले आणि आम्ही पाहिले की त्याने काय केले आणि तो कसा खेळतो. तो एकटा सामना कसा फिरवू शकतो हे आम्ही पाहिलं आहे. त्याने गोलंदाजी केली नाही तर त्याला संघातून वगळले जाईल का? पण सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पंड्याचे महत्त्व आपल्याला माहीत आहे. असंही कोहली यावेळी म्हणाला आहे. 

कोहलीच्या या वक्तव्यानंतर आता सर्वांची उत्सुकता वाढली आहे. कोहलीच्या म्हणण्यानुसार हार्दिक पांड्या खरंच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

सुपर -12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने
24 ऑक्टोबर- भारत विरूद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर- भारत विरूद्ध न्यूजीलंड
3 नोव्हेंबर- भारत विरूद्ध अफगानिस्तान
5 नोव्हेंबर- भारत विरूद्ध स्कॉटलंड
8 नोव्हेंबर- भारत विरूद्ध नामीबिया