David Warner Sports News : अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये (AUS vs AFG) झालेल्या थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची टीम 164 धावापर्यंतच मजल मारू शकली. अफगाणिस्तानने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, मात्र अवघ्या 4 धावांनी त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानचं वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) आव्हान संपुष्टात आलंय.
सामन्यात ऑस्ट्रेलियन बॅटर्सने धुंवाधार फलंदाजी केली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) धमाकेदार सुरूवात करून दिली. चौफेर चौकार खेचत त्याने मिशल मार्शला मोलाची साथ दिली. मात्र, डेव्हिड वॉर्नरने खेळलेल्या चेंडूची एकच चर्चा होताना दिसत आहे. स्विच हिट (Switch Hit) मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉर्नरचा डाव फसला.
वॉर्नर आक्रमक फलंदाजी करत असताना नवीनला बोलवण्यात आलं. सहावी ओव्हर नवीनकडे सोपवण्यात आली. नवीनने (Naveen-ul-Haq) दुसऱ्या चेंडूवर कमालीची बुद्धीमत्ता दाखवत वॉर्नरची विकेट काढली. या बॉलवर वॉर्नर स्विट हिट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नवीनने चतुराईने बॉलिंग करत दुसरी विकेट (David Warner wicket Video) संघाच्या खात्यात टाकली. त्यानंतर नवीनला देखील हसू आवरलं नाही.
दरम्यान, मिचेल मार्शने आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 45 धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलने देखील 54 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 169 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 गडी बाद केलं.