टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

राजीव कासले | Updated: Jun 9, 2024, 06:37 PM IST
टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण title=

IND vs PAK, T20 World Cup 2024 : जगभरातील क्रिकेट प्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहात होते, तो सामना आज 9 जूनला न्यूयॉर्कच्या (New York) नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) आमने सामने असणार आहेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडियाविरुद्ध (Team India) पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला तर टी20 वर्ल्ड कप 2024 मधला पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभ ठरेल. यामुळे पाकिस्तानचं सुपर-8 गाठण्याचं स्वप्न आणखी अवघड होईल. पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर (Pakistan) मात केली होती. 

टी20 वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलच गणित
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येकी पाच संघांचे चार ग्रुप तयार करण्यात आला आहेत. भारत आणि पाकिस्तानचा एकाच ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तानशिवाय अमेरिका, कॅनाडा आणि आयर्लंड संघाचा समावेश आहे. सध्या या ग्रुपमधले तीन संघ प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. आजच्या सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानचेही दोन सामने होतीली. यजमान अमेरिका सलग दोन सामने जिंकून या ग्रुपमध्ये टॉपवर असून त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट संघ असून भारताच्या खात्यात 2 पॉईंट आहेत. दोन पॉईंटसह कॅनडाही तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान आणि आयर्लंड चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असून त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही.

पाकिस्तानचा पराभव झाल्यास?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला तर टीम इंडियाच्या खात्यात 4 पॉईंट्स होतील आणि टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. तर पाकिस्तान आहेत त्याच म्हणजे चौथ्या क्रमांकावर राहिल. या सामन्यानंतर ग्रुप ए मधील सर्व पाच संघांचे प्रत्येकी दोन सामने उरतील. म्हणजे पुढचे दोन्ही सामने जिंकेल तरी पाकिस्तानच्या खात्यात चार पॉईंट जमा होतील. याशिवाय भारत आणि पाकिस्तानच्या ख्यात्यातही चार पॉईंट आहेत. शिवाय भारत आणि अमेरिकेचा नेट रनरेटही चांगला आहे. 

पाकिस्तान संघ करणार क्वालीफाय?
भारताविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. पण पाकिस्तानने आयर्लंड आणि कॅनडा विरुद्धचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास त्यांचं स्पर्धेतील स्थान कायम राहिला. पण त्यांना अमेरिकेवर अवलंबून राहावं लागेल. अमेरिकेचा पुढच्या दोन्ही सामन्यात पराभव झाल्यास पाकिस्तान चांगल्या रन रेटच्या आधारे सुपर-8 ची फेरी गाठू शकतात. अमेरिकेचे उर्वरित दोन सामने भारत आणि आयर्लंडविरुद्ध आहेत.