Ind vs Eng: टीम इंडियातील 'या' खेळाडूला सेमीफायनलमध्ये संधी मिळणार का?

India vs England Semi-Final T20 World Cup: भारतीय संघ T20 विश्वचषकाच्या (t20 world cup) सेमीफायनल मध्ये पोहोचले आहेत. पण टीम इंडियातील असा एक खेळाडू आहे ज्याला अद्याप t20 world Cup मध्ये खेळण्याची संधी मिळाली  नाही.  तो खेळाडू फक्त ड्रेसिंग रूममध्ये तर कधी स्टँडवर तर कधी पॅव्हेलियनमध्ये तो सहकारी खेळाडूंशी संवाद साधताना दिसला आहे. 

Updated: Nov 9, 2022, 10:31 AM IST
Ind vs Eng: टीम इंडियातील 'या' खेळाडूला सेमीफायनलमध्ये संधी मिळणार का? title=

Yajurvendra Chahal in Plyaing XI, Ind vs Eng Semi Final: भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत मजल मारली असून आता टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. दरम्यान,असा एक खेळाडू आहे. जो स्पर्धेत संघासोबत गेला आहे. पण या खेळाडूला अद्याप एकाही सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली नाही. सुरूवातीला यष्टीरक्षक ऋषभ पंतबद्दल (Rishabh Pant) असे बोले जात होते. पण झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) त्याला संधी दिली. 

या खेळाडूला अद्याप खेळण्याची संधी नाही

हरियाणाचा आक्रमक लेगस्पिनर युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) अद्याप टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. 32 वर्षीय खेळाडूचा मुख्य संघात समावेश करण्यात आला होता पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याऐवजी तो फक्त ड्रेसिंग रूममध्ये दिसला. कधी स्टँडवर तर कधी पॅव्हेलियनमध्ये तो सहकारी खेळाडूंशी संवाद साधताना दिसला. कधी तो काहीतरी खात-पिऊन तर कधी मित्रांना पाणी पाजत असे, अशीच ही स्पर्धा त्यांच्यासाठी आतापर्यंत पार पडली आहे.

वाचा : फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलँड आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत  

उपांत्य फेरीत खेळणार का?

चहल इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार की यावेळीही त्याची निराशा होणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच असेल. रोहित शर्माला (rohit sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा शक्यता कमी आहे. त्याचे कारण म्हणजे अक्षर पटेल चांगली कामगिरी करत आहे आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विन त्याच्यापेक्षा अनुभवी आहे. मेलबर्नमध्ये अश्विनने गेल्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध तीन विकेट घेतल्या होत्या. यामुळे रोहितला उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्याबाबत थोडे सावध राहणे आणि किमान सामना खेळून परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेणाऱ्या अशा खेळाडूला संधी देईल.

अशी आहे चहलची कारकीर्द 

चहलला भारताकडून मर्यादित षटकांमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्याने आतापर्यंत 67 एकदिवसीय आणि 69 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 118 विकेट्स आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 85 विकेट्स आहेत.