T20 World Cup पूर्वी पाकिस्तानी बॉलरची टीम इंडियाला धमकी, म्हणाला...

पाकिस्तानी बॉलरला दिवसा पडलं स्वप्न,  इशारा देत म्हणाला...

Updated: Sep 29, 2022, 07:57 PM IST
T20 World Cup पूर्वी पाकिस्तानी बॉलरची टीम इंडियाला धमकी, म्हणाला... title=

India vs Pakistan : आगामी T20 World Cup ला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपारिक विरोधी संघ आमनेसामने येणार आहेत. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5-1 असा विजयी विक्रम आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये देखील भारतीय खेळाडू पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भारत पाकिस्तान सामन्यासाठी सर्वजण उत्सुक असताना आता पाकिस्तानच्या एका खेळाडूने भारतीयांचा पारा चढवला आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर हारिस रऊफ (haris rauf) याने स्वत:ची कॉलर टाईट करत टीम इंडियाला इशारा दिलाय. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय फलंदाजांना माझ्याविरुद्ध खेळणं सोपं असणार नाही, असं हारिस म्हणाला.

बिग बॅश लीग खेळण्याच्या अनुभव असल्याने 23 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या T20 World Cup सामन्यात यश मिळवण्याचा हारिसला विश्वास गगनाला टेकला आहे. मात्र, भारतीय खेळाडू (Indian cricket team) हारिसला अतिविश्वास जमिनीवर आणण्यासाठी पुर्ण तयारी करत आहेत.

नेमकं काय म्हणाला haris rauf -

मी T20 World Cup मध्ये माझं सर्वोत्तम प्रदर्शन देऊ शकलो तर भारतीय फलंदाजांसाठी मला खेळवणे सोपे जाणार नाही. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना होत असल्याने मला खूप आनंद होत आहे. हे माझे घरचे मैदान आहे कारण मी मेलबर्न स्टार्सकडून खेळतो. मला तिथे कसे खेळायचे हे माहित आहे, असं हारिस म्हणाला.
 
भारताविरुद्ध खेळण्यासाठी काही खास प्लॅन आहे का?, असा प्रश्न विचारल्यावर, भारताविरुद्ध गोलंदाजी कशी करायची याचीही मी रणनीती आखायला सुरुवात केली आहे, असंही उत्तर हारिसने (Pakistan fast bowler haris rauf) यावेळी दिलं.

"Girlfriend ला फिरवायचंय, इतके रूपये द्या", भारतीय क्रिकेटरने लगेचच Gpay करुन टाकले

दरम्यान, मागील T20 World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले होते. त्यावेळी पाकिस्ताने भारताला हारवलं होतं. भारताविरुद्ध पाकिस्तानला फक्त एकच सामना जिंकता आला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता रोहितसेना सज्ज झाल्याचं दिसत आहे.