T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघाने टी-20 वर्ल्ड कपमधील आपला पहिला विजय मिळवला आहे. नेदरलँड संघाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. नेदरलँड संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्यासमोर नेदरलँडने 91 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान संघाने हे आव्हान 36 चेंडू राखून विजय मिळवला आहे.
नेदरलँड संघाकडून कॉलीन अकरमनने सर्वाधिक 27 धावा आणि स्कॉट एडवर्ड्स 15 धावा केल्या. हे दोन फलंदाज वगळता नेदरलँडच्या एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक 3 विकेट्स आणि मोहम्मद वसीम यांनी 2 तर शाहीन आफ्रिदी, नसीम शाह हॅरिस रॉफ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या नौका पार करून दिली. बाबर आझम 4 धावांवर रनआउट झाला तर फखर जमान आणि शान मसूद यांनी अनुक्रमे 20 आणि 12 धावांची खेळी केली.
पाकिस्तानला पहिला विजय मिळवण्यासाठी तिसऱ्या सामन्याची वाट पाहावील लागली. भारत आणि झिब्बाब्वेकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान संघ हताश झाला होता. आजच्या विजयामुळे पुन्हा संघाच्या आशा जिवंत झाल्या आहेत.