T20 World Cup: केएल राहुल Team India मध्ये राहणार की नाही, राहुल द्रविडने दिले स्पष्टीकरण

Rahul Dravid: T20 विश्वचषक 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा केएल राहुलच्या जागी टांगती तलवार आहे. बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात केएल राहुलला वगळले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Updated: Nov 1, 2022, 03:01 PM IST
T20 World Cup:  केएल राहुल Team India मध्ये राहणार की नाही, राहुल द्रविडने दिले स्पष्टीकरण  title=

Rahul Dravid Press Conference:  T20 विश्वचषक 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा ओपनर केएल राहुलच्या जागी टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या सामन्यात केएल राहुलला वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला प्लेइंग 11 मध्ये रोहित शर्मा सोबत ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. मात्र, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुल संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या टीम इंडियातून केएल राहुलला वगळले जाणार?

राहुल द्रविडच्या म्हणण्यानुसार, केएल राहुलला टीम इंडियाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि तो 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंग करत राहणार. राहुल द्रविड म्हणाला, 'मला आणि रोहितला विश्वास आहे की, केएल राहुल त्याच्या फलंदाजीचा प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे केएल राहुलच ओपनिंग करणार यात काही शंका नाही.  केएल राहुल हा महान खेळाडू आहे, तो जोरदार पुनरागमन करेल याची आम्हाला खात्री आहे.

'केएल राहुल काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे'

टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, 'रोहित शर्मा या टी-20 विश्वचषकातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेवतो. आमचा केएल राहुलला पूर्ण पाठिंबा आहे आणि तो काय सक्षम आहे हे आम्हाला माहीत आहे.

प्रशिक्षक द्रविडने दिनेश कार्तिकबाबत मोठे अपडेट दिले

टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 विश्वचषक सामना खेळणार की नाही याबाबत मोठी माहिती दिली. 

राहुल द्रविड म्हणाला, 'दिनेश कार्तिक चांगली कामगिरी करत आहे. तो प्रशिक्षणासाठीही पोहोचला आहे. तो बांगलादेशविरुद्ध T20 विश्वचषक 2022 सामना खेळणार की नाही हे आम्ही उद्या सकाळी ठरवू. दिनेश कार्तिक खडतर परिस्थितीत फलंदाजी करत आहे. त्यामुळे अशा खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे.

वाचा : "बांगलादेशने भारताला पराभूत केले....," IND vs BAN सामन्यापूर्वी शकिब अल हसनचे खळबळजनक वक्तव्य 

बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही

भारताला उद्या दुपारी 1.30 वाजल्यापासून बांगलादेश विरुद्ध T20 विश्वचषक 2022 सामना खेळायचा आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, 'बांगलादेश हा संघ खूप चांगला आहे आणि आम्ही त्यांना अजिबात हलक्यात घेऊ शकत नाही. चांगले क्षेत्ररक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि या क्षेत्रात आम्ही कोणतीही चूक करू शकत नाही.