T20 World Cup : ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात झाली असून आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूला कोरानाचा संसर्ग झाला तर त्याला विलगीकरणात ठेवावं लागत होतं. मात्र आता कोरोना बाधित खेळाडूंनाही वर्ल्ड कप खेळण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन सरकारने कोरोनाबाधित लोकांचं विलिगीकरण बंद केलं होतं. आता याच मुद्द्यावरून आयसीसीनेही विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंसाठीही हाच निर्णय घेतला होता. टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंना कोरोना चाचणी अनिवार्य केली जाणार नाही.
जर एखाद्या खेळाडूला कोरोना झाला तर त्याला सामन्यामध्ये खेळवायचं की विश्रांती द्यायची याबाबतचा निर्णय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या डॉक्टरांना घ्यावा लागेल. खेळाडूला मैदानात उतरवायचं की बाकीच्यांपासून वेगळे करायचं याची संपूर्ण जबाबदारी संघाचं डॉक्टर घेतील. आता या निर्णयावर क्रिकेट विश्वातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या वर्षी UAE मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकासाठी खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यामध्ये खेळाडूंना बायो-बबलच्या बाहेर जाता येत नव्हतं आणि बाहेर कोणालाही भेटता येत नव्हतं.