मोठी बातमी! T20 World Cup दरम्यान युवराज सिंगकडून मैदानावर उतरण्याची घोषणा

त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांचा आनंद सातव्या आसमानावर आहे.

Updated: Nov 2, 2021, 04:54 PM IST
मोठी बातमी! T20 World Cup दरम्यान युवराज सिंगकडून मैदानावर उतरण्याची घोषणा title=

मुंबई : T20 विश्वचषक 2021 भारतासाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून 8 विकेटने पराभव झाला होता. दरम्यान, भारताचा दिग्गज फलंदाज युवराज सिंगने आता मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा सोशल मीडियावरुन केली आहे. ज्याने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

युवराजकडून मैदानात उतरण्याची घोषणा

युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे 'तेरी मिट्टी'  वाजत आहे. युवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुझं गंतव्यस्थान देव ठरवतो. चाहत्यांच्या मागणीनुसार मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मैदानावर परतेन. तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नेहमी साथ देत राहा आणि हेच खऱ्या चाहत्याचे लक्षण आहे.'

त्याच्या या पोस्टमुळे चाहत्यांचा आनंद सातव्या आसमानावर आहे. युवराजच्या चाहत्यांना लवकरच त्याला मैदानावर खेळताना पाहाता येणार आहे.

सिक्सर किंग युवराज

भारताचा दिग्गज फलंदाज युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरवर सहा सिक्स ठोकले होते. त्याच्या या विक्रमामुळे जग त्याला सिक्सर किंग म्हणून ओळखू लागले. आहे. युवराज हा अतिशय आक्रमक खेळाडू आहे.

युवराजने तो मैदानावर उतरणार असे जरी सांगितले असले तरी तो कोणती स्पर्धा खेळणार आहे याचा खुलासा केलेला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

युवी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळू शकतो

युवराज सिंगने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो ग्लोबल कॅनडा टी20 लीग आणि रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळताना दिसला आहे. युवराजने फेब्रुवारीमध्ये पुनरागमन करण्याची घोषणा केली आहे. कदाचित तो रोड सेफ्टी मालिकेतून पुनरागमन करेल. युवराज जेव्हा लयीत असतो, तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीचा फज्जा उडवू शकतो. तसेच त्याच्यात मॅच पलटवण्याचीही क्षमता आहे.