मुंबई : टी-20 विश्वाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला 8 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यानंतर टीम इंडिया जवळ-जवळ रेसच्या बाहेरच पडण्यात जमा आहे. परंतु टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्याची आशा जिवंत ठेवायची असेल, तर हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल.
त्यामुळे संघाला असं काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे, ज्यामुळे ते फासे फिरवून चॅम्पीयन्सच्या यादित जागा मिळवू शकतील. यामध्ये संघात हे तीन खेळाडू मदत करु शकतात आणि टीम इंडियासाठी लकी ठरु शकतात.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनच्या जागी वरुण चक्रवर्तीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय चुकीचा ठरला. वरुणने दोन्ही सामन्यात धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. आज अफगाणिस्तानविरुद्ध वरुणच्या जागी अश्विनला संधी मिळू शकते. अश्विनकडे खूप अनुभव आहे, आणि त्याच्या बॉलवर फटके मारणे फलदांजांना सहज शक्य होत नाही.
अश्विन पॉवरप्लेमध्ये घातक गोलंदाजी करतो आणि तो अतिशय किफायतशीर गोलंदाजीही करतो. भारताच्या विजयात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर्समध्ये धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. संपूर्ण क्रिकेट विश्वात त्याच्यापेक्षा चांगला यॉर्कर क्वचितच कोणी फेकला असेल. न्यूझीलंडविरुद्ध बुमराहने 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 2 बळी घेतले. 2019 च्या टी२० विश्वचषकात भारताकडून विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. बुमराह टीम इंडियासाठी अफगाणिस्तानविरुद्ध विजयाचे दरवाजे उघडू शकतो. भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताचा महान फलंदाज रोहित शर्माची गणना जगातील सर्वोत्तम सलामीवीरांमध्ये केली जाते. त्याने T20 क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत. रोहित शॉट बॉलवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो भारतासाठी सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. रोहित सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान धावा करतो. जोपर्यंत रोहित क्रीजवर आहे तोपर्यंत भारताच्या विजयाची शक्यता कायम आहे.