T20 World Cup 2021, IND VS ENG | कॅप्टन विराट कोहलीचा मोठा निर्णय, म्हणाला....

टीम इंडियाच्या या T 20 World Cup मधील मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. त्याआधी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मोठा निर्णय घेतला आहे.  

Updated: Oct 18, 2021, 10:47 PM IST
T20 World Cup 2021, IND VS ENG | कॅप्टन विराट कोहलीचा मोठा निर्णय, म्हणाला....  title=

यूएई : टीम इंडियाच्या (Team India) टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान (INDvsPAK) विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. याआधी टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध सराव सामना खेळतेय. विराटने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या टॉसदरम्यान विराटने मोठी घोषणा केली. 

संपूर्ण टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलामीला खेळणार नसल्याचं विराटने म्हंटलं. सलामीला केएल राहुल आणि रोहित शर्मा येणार असल्याचं विराट म्हणाला. (T20 World Cup 2021  KL Rahul will open in whole tournament says Virat Kohli during toss of the practice match against England)
 
जेव्हा इंग्लंड भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हा विराट टी 20 मालिकेत सलामीला खेळला होता. तसेच टी 20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंगला खेळणार असल्याचं विराटने म्हंटलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमात आरसीबीकडून विराटने ओपनिंग केली होती. मात्र केए ल राहुलची दमदार कामगिरी पाहता विराटने हा निर्णय बदलला आहे.

विराट काय म्हणाला? 

"आयपीएलआधी चित्र वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. आता केएलला डावलणं अवघड आहे. रोहित ओपनर आहेच, सोबत अफलातून खेळाडू आहे. मी तिसऱ्या क्रमांकरावर बॅटिंग करेन", असं विराटने नमूद केलं.  

सराव सामन्याचं महत्तव

आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूची भूमिका ही वेगळी होती. मात्र टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपली भूमिका चोखपणे पार पाडण्यासाठी ही योग्य वेळ आहे. "आम्ही टीममध्ये उत्साह निर्माण करु इच्छितो.  आम्ही सर्वच वेगवेगळ्या संघाविरुद्ध खेळून आलोय. त्यामुळे प्रत्येकाला लवकर आपल्या भूमिकेशी जुळवून घेवू इच्छितो. परिस्थितीशी जुळतं घेणं हे आमचं सर्वात पहिलं लक्ष्य आहे. वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात कशी करायची, हे आम्हाला माहिती आहे. सराव सामन्यात आम्ही अधिकांश खेळाडूंना संधी देऊ इच्छितो", असं विराटने टॉसदरम्यान सांगितलं.   

टी 20 वर्ल्ड कपसाठी  टीम इंडिया :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. 
 
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.