मुंबई : 152 किमी ताशी वेगानं बॉल टाकणाऱ्या घातक बॉलरला देशाकडून खेळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. उमरानला कदाचित टीम इंडियातून आता खेळण्याची संधी मिळू शकते की नाही यावर अजून संभ्रम आहे. उमरानला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी जोर लावून धरली जात आहे.
काश्मीरच्या उमरान मलिकने आयपीएलमध्ये आपल्या घातक बॉलिंगने फलंदाजांना घाम फोडला. एवढंच नाही तर वेग आणि आक्रमकपणा यामुळे फलंदाजांना त्याच्या बॉलचा सामना करणंही कठीण जात आहे.
उमरान मलिक हैदराबाद टीमकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. 4 कोटी रुपये देऊन त्याला टीममध्ये घेतलं आहे. या खेळाडूनं 12 सामन्यात 18 विकेट्स काढल्या आहेत. 2021 मध्ये आयपीएलमध्ये त्याने डेब्यू केला.
काश्मीरचा हा युवा गोलंदाज भविष्यात भारताचा स्टार खेळाडू ठरु शकतो. उमरानला भारतीय संघात संधी देण्याची मागणी ही आता होऊ लागली आहे.
काश्मीरचा युवा गोलंदाज उमरान (Umran Malik) सध्या त्याच्या बॉलिंगमध्ये चर्चेत आलाय. उमरानचा वेग 150Kmph च्या वर आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने 8 सामन्यात 15 विकेट घेतले आहेत.
पर्पल कॅपच्या स्पर्धेत तो युजवेंद्र चहल नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. भारताकडे इतक्या वेगाने बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांची संख्या खूपच कमी आहे. उमरानला टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी संधी दिली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.