कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात रविवारी 30 ऑक्टोबरला सामना रंगणार आहे. या सामन्याला दुपारी साडे चार वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधी पाकिस्तान त्यानंतर नेदरलँडवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर टीम इंडिया आफ्रिका विरुद्धचा सामना जिंकून सेमी फायनलची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. (t 20 world cup 2022 ind vs sa team india captain rohit sharma is likely to replace k l rahul with rishabh pant)
कॅप्टन रोहित या सामन्यासाठी ओपनर केएल राहुलच्या (KL Rahul) जागी ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी देऊ शकतो. केएल पाकिस्तान आणि नेदरलँड विरुद्ध सपशेल अपयशी ठरला. केएलने पाकिस्तान विरुद्ध 4 आणि नेदरलँड विरुद्ध 9 धावांची खेळी केली. त्यामुळे रोहित केएलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
दरम्यान केएलऐवजी पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतने याआधी अनेकदा टीमसाठी ओपनिंग केली आहे. तसेच ऋषभ रोहितसोबत ओपनिंगला आल्याने लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन तयार होईल. ज्यामुळे ही जोडी आफ्रिकेच्या गोलंदाजांना डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे आता रोहित केएलला वगळून पंतला संधी देणार का, हे काही तासातच स्पष्ट होईल.