IND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला..

दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागाला दुखापत झाली होती.   

Updated: Nov 1, 2022, 04:30 PM IST
IND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला.. title=

मुंबई : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2022) चौथा सामना बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध रंगणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी एडलेडला सुरुवात होणार आहे. रोहितसेनेला सलग 2 सामन्यात विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियासाठी बांगलादेश विरुद्ध होणारा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने महत्त्वाचा असणारा आहे. आफ्रिके विरुद्ध विकेटकीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) दुखापत झाली होती. त्यामुळे बांगलादेश विरुद्ध विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला संधी (Rishbh Pant) मिळणार की कार्तिकच खेळणार याबाबत चर्चांना उधाण आलंय. याबाबत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) स्पष्ट भूमिका माडंलीय. (t 20 world cup 2022 ind vs ban head coach rahul dravid reaction on dinesh karthik playing or not against to bangladesh)

द्रविड काय म्हणाला? 

"कार्तिकच्या दुखापतीचा आढावा घेऊन तो खेळणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय बुधवारी घेतला जाईल", असं द्रविडने स्पष्ट केलं. कार्तिकला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागास दुखापत झाली होती. यानंतर कार्तिकला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. यानंतर पंतने विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली होती. 

"दुर्देवाने कार्तिकने बाउंसर अडवण्यासाठी हवेत उडी घेतली. मात्र कार्तिक जमिनीवर चुकीच्या पद्धतीने पडला. ज्यामुळे त्याच्या पाठीला त्रास झालाय.", असं बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत  द्रविडने सांगितलं. 

"आवश्यक उपचारानंतर कार्तिक आज उत्तमरित्या विकरेटकीपिंग करताना दिसला. कार्तिकचं सरावादरम्यान आम्ही निरिक्षण केलं. आजच्या दमदार सरावानंतर कार्तिकची फिटनेस आम्ही उद्या (2 नोव्हेंबर) पाहू.  फिटनेस पाहिल्यानंतर कार्तिक खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ", असंही द्रविडने सांगितलं.