टीम इंडियाकडून न्यूझीलंडसाठी 111 धावांचं आव्हान, बॉलर्सच्या हाती कमान

न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी टीम इंडियाच्या बॉलर्सना मोठं आव्हान

Updated: Oct 31, 2021, 09:19 PM IST
टीम इंडियाकडून न्यूझीलंडसाठी 111 धावांचं आव्हान, बॉलर्सच्या हाती कमान title=

दुबई: टीम इंडिया विरुद्ध किवी टी 20 वर्ल्ड कप सामना सुरू आहे. यामध्ये टीम इंडियाला जेमतेम 110 धावा करण्यात य़श आलं आहे. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी टीम इंडियाच्या फलंदाजांना जेरीस आणलं. मात्र तरीही जडेजानं डाव सावरत 110 पर्यंत पल्ला गाठला. आता न्यूझीलंड संघाला 111 धावा विजयासाठी करायच्या आहेत. एक दृष्टीनं न्यूझीलंडसाठी हे मोठं आव्हान नाही. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांवर आता मोठी जबाबदारी असणार आहे. 

टीम इंडियाच्या फलंदाजांची बॅटिंग लाईन खराब होती असं आजच्या सामन्यात तरी दिसत आहे. आता भिस्त गोलंदाजांच्या हाती आहे. न्यूझीलंडच्या धडाकेबाज फलंदाजांना तंबुत धाडण्यासाठी ते कसा प्लॅन तयार करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. हा सामना जिंकणं टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. 

के एल राहुलनं 16 बॉलमध्ये 3 चौकारांच्या मदतीनं 18 धावा केल्या. ईशान किशन 4, रोहित 14, विराट कोहली केवळ 9 धावा करून आऊट झाला. पंतने 12 तर पांड्याने 23 धावा केल्या. रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने संघात सर्वात जास्त धावा केल्या आहेत. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली, ईशान किशन, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, बुमराह, वरूण चक्रवर्ती, आणि के एल राहुल

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन

मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन (कर्णधार), जेम्स नीशम, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मिशेल सेंटनर, ईश सोढी, एडम मिल्ने, ट्रेन्ट बोल्ट आणि टिम साऊदी