Arjun Tendulkar : IPLमध्ये डेब्यूची संधी न मिळालेला अर्जून तेंडुलकर या टीमकडून खेळणार

अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही.   

Updated: Oct 10, 2022, 05:47 PM IST
Arjun Tendulkar : IPLमध्ये डेब्यूची संधी न मिळालेला अर्जून तेंडुलकर या टीमकडून खेळणार   title=

पणजी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा (Sachin Tendulkar Son) अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला आयपीएलच्या 15 व्या मोसमात अखेरपर्यंत पदार्पणाची वाट पहावी लागली, मात्र संधी काही मिळाली नाही. मात्र आता अर्जुन डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्जुन लवकरच प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing Eleven) खेळताना दिसणार आहे. (syed mushtaq ali t 20 trophy sachin tendulkar son arjun tendulkar will play with goa team)

अर्जुन आगमी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत गोव्याकडून खेळणार आहे. अर्जुनचा टीम गोवामध्ये समावेश करण्यात आला आहे. अर्जुन गोव्याचा कॅप्टन स्नेहल कौथंकरच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच अनेक मोसम मुंबईसाठी खेळणारा सिद्धेश लाडही गोवा टीमचं प्रतिनिधित्व करणार आहे.

11 ऑक्टोबरपासून सुरुवात 

सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी मुंबई आणि गोवा हे आपला सलामीचा सामना खेळणार आहे. मुंबईचा सामना मिझोराम विरुद्ध होणार आहे. तर गोव्याची गाठ त्रिपुरा विरुद्ध असणार आहे. तर अंतिम सामना हा 5 नोव्हेंबरला होणार आहे.

मुंबईची कॅप्टन्सी रहाणेकडे 

अजिंक्य रहाणे या स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व करणार आहे. मुंबई टीममध्ये पृथ्वी शॉ, शिवम दुबे, सरफराज खान आणि धवल कुलकर्णी कुलकर्णीचा समावेश आहे.

टीम गोवा : एस कौथंकर (कॅप्टन), डी गोयनकर, वी गोवेकर, एस प्रभुदेसाई, टी सावकर, ए पंड्रेकर, डी मिसल, अमित यादव, एस दुबाशी, एफ अलेमो, एल गर्ग, आर नाइक, अर्जुन तेंदुलकर, एकनाथ केरकर, सिद्धेश लाड, आई गाडेकर, ए कौशिक, वी कहलो, वी नाइक आणि एम रेडकरो.