सुरेश रैनाला एमएस धोनीची 'ही' गोष्ट अजिबात आवडत नाही, क्रिकेटरचं मोठं वक्तव्य

रैनाला आपल्या खास मित्राचं वागणं आवड नाही हे जाणून लोकांमध्ये चर्चा सुरू झाली.

Updated: Dec 6, 2021, 02:34 PM IST
सुरेश रैनाला एमएस धोनीची 'ही' गोष्ट अजिबात आवडत नाही, क्रिकेटरचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना सध्या अनेक जुन्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. सुरेश रैना आणि धोनीच्या मैत्रीबाबत कोणाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. दोघे ही एकमेकांचे खुप खास मित्र आहेत आणि ते एकमेकांना खेळण्यासाठी मार्गदर्शन देखील करतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याची एक मुलाखत समोर आली आहे ज्यामध्ये तो महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगत आहे.  परंतु सुरेश रैनाने या मुलाखतीत धोनीबद्दल वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

या मुलाखतीत सुरेश रैनाने त्याला धोनीची एक गोष्ट आवडत नसल्याचे सांगितले. चक्क रैनाला आपल्या खास मित्राचं वागणं आवड नाही हे जाणून लोकांमध्ये चर्चा सुरू झाली.

खरं तर हा व्हिडीओ सुरेश रैनाच्या रेडिओ जॉकी रौनकच्या मुलाखतीचा आहे. हा व्हिडीओ RJ ने 1 डिसेंबर 2021 रोजी त्याच्या वैयक्तिक YouTube चॅनलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ '13 जवाब नहीं' सीरीजचा दुसरा भाग आहे. यामध्ये आरजेने रैनाला अनेक प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे क्रिकेटरने मजेशीर पद्धतीने दिलं.

रैनाला धोनीची ही सवय आवडत नाही

या सीरीजमध्ये जेव्हा आरजेने रैनाला विचारले की, तुला धोनीची कोणती गोष्ट आवडत नाही? त्यावेळा रैना म्हणाला की, तो माझा फोन उचलत नाही जे मला अजिबात आवडत नाही. याशिवाय रैनाने या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरशी संबंधित एक प्रसंगही शेअर केला आहे.

बप्पी दा चं हे गाणं सचिनला खूप आवडतं

या मुलाखतीत सचिन तेंडुलकरशी संबंधित एका किस्स्याचा संदर्भ देत रैना म्हणाला की, 'सचिन पाजीला बप्पी दाचे 'याद आ रहा है' हे गाणे आवडते. अनेकदा ते ड्रेसिंग रूममध्येही हे गाणे ऐकत असतात. शतक करण्यापूर्वी ते अनेकदा हे गाणे ऐकायला जायचे. असे अनेकवेळा घडले की, जेव्हा त्यांनी हे गाणं ऐकलं आहे तेव्हा त्यांनी शतक केलं आहे.

याशिवाय रैनाने हेही सांगितले की, जेव्हा त्याने कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते. त्यावेळी मास्टर ब्लास्टरने त्याला ट्रीटही दिली. या डावखुऱ्या फलंदाजाने सचिन तेंडुलकरचा उल्लेख त्याच्या 'बिलीव्ह' या आत्मचरित्रात पहिल्या ओळीपासूनच केला आहे.