टी 20मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण? सुनिल गावस्कर म्हणतात विराट किंवा हिटमॅन नाही तर...

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते टी 20 फॉरमॅटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण?

Updated: Jun 4, 2021, 10:50 AM IST
टी 20मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण? सुनिल गावस्कर म्हणतात विराट किंवा हिटमॅन नाही तर... title=

मुंबई: टी 20 मध्ये सर्वात उत्तम फलंदाज कोण आहे यासंदर्भात सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते हिटमॅन रोहित शर्मा किंवा विराट कोहली नाही तर आणखी एक फलंदाज हा टी 20मध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे. 

सुनील गावस्कर यांच्यामते टी 20मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज हा हिटमॅन किंवा किंग कोहली नाही तर 360 डिग्री शॉट खेळणारा ए बी डिव्हिलियर्स आहे. दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू ए बी डिव्हिलियर्स हा सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

'डिव्हिलियर्स प्रत्येक शॉट खेळतो. तो जेव्हा शॉट्स खेळतो ते खरंच पाहण्यासारखे असतात. तो फलंदाजी करताना मला पाहायला आवडतं.' असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. 

अनेक माजी खेळाडूंनी टी -20 फॉरमॅटवर टीका केली आहे आणि टी -20 क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट आपली प्रासंगिकता गमावत असल्याचे मत व्यक्त केलं आहे. सुनील गावस्कर म्हणाले, 'मला माहित आहे की माझ्या काळात बरेच लोक खेळत असत, टी -20 फॉर्मेटवर खूष नाहीत पण मला तो आवडतो. तीन तासांच्या सामन्याचा निकालही लवकर येतो त्यासाठी मला तो आवडतो असंही गावस्कर यांनी म्हटलं आहे. 

यंदाच्या IPLच्या पहिल्या 7 सामन्यांमध्ये ए बी डिव्हिलियर्सची कामगिरी तुफान होती. डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून IPL खेळत आहे. डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.